Redmi Photo Credits-Twitter)

आज संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने आपल्या ग्राहकांना तब्बल 6 हजार रुपयांची सूट दिली आहे. Xiaomi च्या वेबसाईटवर आज खास 'Republic Day Sale' सुरू आहे. या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर 6 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे तुमचा मोठा फायदा होणार आहे. तुम्ही कमी पैशात चांगला मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची संधी सोडू नका.

या खास ऑफरमुळे शाओमी कंपनीच्या Redmi Note 8 Pro हा मोबाईल तुम्हाला 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त तुम्हाला 1 हजार रुपयांचा अॅडिशनल डिस्काऊंटही मिळू शकतो. यात Redmi Note 8 Pro 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे. या मोबाईलमध्ये 648 मेगापिक्सल कॅमेरा आणि 4500 mAh Battery बॅटरी हे फिचर्स असणार आहेत. हा मोबाईल निळा, काळा आणि पांढरा अशा 3 रंगात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या आवडीच्या रंगाचा मोबाईल खरेदी करू शकता.

याशिवाय तुम्हाला रेडमी सिरिजमध्ये K20 आणि K20 Pro अशा दोन मोबाईलवर भरघोस सूट मिळणार आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. (हेही वाचा -  2024 पर्यंत रोबोट करतील मॅनेजर्सची 69 टक्के कामे; लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात)

Redmi-6-Pro
रेडमी (Photo Credit: Xiaomi Global Website)

याव्यतिरिक्त काही खास मोबाईलवर कॅशबॅकही देण्यात येणार आहे. या सेलमध्ये Redmi Note 8 हा 4 कॅमेरा असलेला मोबाईल तुम्हाला 10 हजार रुपयांत मिळणार आहे. विशेष म्हणजे यावर काही खास ऑफर्स आणि कॅशबॅकही देण्यात येणार आहेत. रेडमीच्या मोबाईलवर देण्यात येणाऱ्या या खास ऑफर्स केवळ आजच्या दिवसापुरत्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची सुवर्णसंधी सोडू नका.