
रिलायन्स जिओ यांनी त्यांचे नवे टॅरिफ प्लॅन 6 डिसेंबर पासून लागू केले आहेत. या प्लॅनचे दर 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र अन्य टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ दरात 40 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. म्हणजेच आता सध्या ग्राहकांना जुने प्लॅन वापरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र तरीही रिलायन्स जिओ युजर्सना अजूनही जुने प्रीपेड प्लॅन खरेदी करता येणार आहेत.
जुन्या प्रीपेड प्लॅन रिचार्ज करण्याची सुविधा मोजक्याच युजर्ससाठी आहे. जिओच्या या प्लॅनचा फायदा त्याच ग्राहकांना मिळणार आहे , ज्यांच्याकडे अद्याप कोणताही प्लॅन अॅक्टिव्ह केलेला नाही. यासाठी युजर्सला कंपनीच्या वेबसाईटवर किंवा अॅपच्या माध्यमातून याचा लाभ घेता येणार आहे. येथे जाऊन तुम्हाला जुने प्रीपेड प्लॅन दाखवले जाणार आहेत. मात्र जर तुम्ही नुकतेच नवे प्रीपेड प्लॅन खरेदी केले असल्यास तुम्हाला जुने प्रीपेड प्लॅन दाखवले जाणार नाहीत.इनअॅक्टिव्ह अकाउंट असलेल्या जिओ ग्राहकांना मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या माध्यमातून लॉगइन करावे लागणार आहे. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन 'Tariff Protection' ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला जुने जिओचे प्रीपेड प्लॅन दिसून येणार आहेत.(Reliance Jio, एअरटेल, वोडाफोन कंपन्यांचे प्रत्येक महिन्यासाठी 84GB पर्यंत डेटा असणारे बेस्ट प्लॅन जाणून घ्या)
जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला प्रत्येक दिवसासाठी 3GB डेटा मिळणार आहे. या 28 दिवसांच्या प्लॅनध्ये एकुण 28GB डेटा असून त्याच्या सोबत 100 फ्री एसएमएस सुद्धा पाठवता येणार आहेत. प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सला जिओ-टू-जिओ फ्री अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 FUP मिनिट्स मिळणार आहेत.