Reliance Jio च्या या स्वस्त प्लॅनमध्ये युजर्सला मिळणार अनलिमिटेड डेटासह कॉलिंगची सुविधा, जाणून घ्या अधिक
Reliance Jio (Photo Credit: Facebook)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) च्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा एक अधिक उत्तम असे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. ज्या युजर्सला अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगच सुविधा हवी असते त्यांच्यासाठी जिओचे काही प्लॅन उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये युजर्सला हायस्पीड डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाणार आहे.(JioPages Browser: जिओने लॉन्च केले स्वदेशी मोबाईल वेब ब्राउझर; जाणून घ्या याची खासियत आणि वैशिष्ठ्ये)

जिओ कंपनीच्या 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300SMS सह एकूण 2GB डेटा मिळणार आहे. त्याचसोबत युजर्सला अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार FUP मिनिट्स दिले जाणार आहेत. दरम्यान, युजर्सला जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. अन्य बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी युजर्सला या प्लॅनमध्ये जिओ लाइव्ह टीव्ही, म्युझिक आणि जिओ सिनेमा अॅपचे सब्सक्रिप्शन मोफत देणार आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.

तसेच 149 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. यामध्ये 1जीबी डेटा आणि 100एसएमएस मिळणार आहे. तसेच युजर्सला अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 300 एफयुपी मिनिट दिले जाणार आहेत. जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधेसह प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन ही मोफत दिले जाणार आहे.(ग्राहकांना Jio ची भेट! आता विमानामध्ये घेऊ शकणार Calling, Internet चा आनंद; जाणून घ्या काय आहेत जिओचे आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्स)

Jio च्या 199 रुपयांचा प्लॅन हा 28 दिवसांच्या वैधतेसह आहे. यामध्ये 1.5 जीबी डेटासह 100एसएमएस मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 एफयुपी मिनिट्स मिळणार आहेत. युजर्सला जिओ-टू-जिओसाठी अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. अन्य बेनिफिट्सबद्दल बोलयाचे झाल्यास युजर्सला लाइव्ह टीव्ही, म्युजिक आणि जिओ सिनेमा अॅपचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.

जिओ कंपनीचा आणखी एक स्वस्त असा रिचार्ज प्लॅन म्हणजे 249 रुपयांत तुम्हाला करता येणार आहे. यामध्ये युजर्सला दररोज 2जीबी डेटासह 100SMS मिळणार असून अन्य नेटवर्कवर कॉलिंगाठी 1000 एफयुपी मिनिट्स दिले जाणार आहेत. जिओ-टू-जिओ नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी अनलिमिटेड मिनिट्स मिळणार आहेत. या व्यतिरिक्त युजर्सला प्रीमियम अॅपचे सुद्धा फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.