अन्य टेलिकॉम कंपन्यांनी आययुसी (IUC) भरण्याच्या कारणामुळे गेल्या महिन्यात युजर्सला झटका दिला. त्यानंतर पुन्हा रिलायन्स जिओकडून युजर्सला धक्का देण्यात आला असून त्यांच्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वॅलिडिटी कमी करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला यापूर्वी 28 दिवसांची वॅलिडिटी देण्यात येत होती. मात्र आता त्याची वॅलिडिटी 24 दिवस करण्यात आली आहे. हा प्लॅन My Jio अॅपवर कमी केलेल्या वॅलिडिटीसह दाखवण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवासांत युजर्सला खुश ठेवण्यासाठी काही ऑल-इन-वन प्रीपेड प्लॅन सुद्धा लॉन्च केले आहेत. हे प्लॅन्स स्मार्टफोन युजर्स व्यतिरिक्त JioPhone युजर्ससाठी नव्याने लॉन्च केले आहे.
जिओने युजर्सला दिलासा देत असे ही म्हटले की, ज्या युजर्सनी 10 ऑक्टोबरपूर्वी रिजार्ज केले आहे त्यांना अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अतिरिक्त आययूसी पॅक रिचार्ज करावा लागणार नाही. रिलायन्स जिओचे रेग्युलर रिजार्ज पॅक्सचा वापर करणारे युजर्सने जर 10 ऑक्टोबरनंतर रिजार्च केले असल्यास त्यांना आययूसीचा वेगळा प्लॅन रिजार्ज करावा लागणार आहे. या पॅकमध्ये अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कॉलिंग मिनिट्स ऑफर देण्यात आली आहे. त्याचसोबत जिओ युजर्सला अतिरिक्त डेटा सुद्ध देण्यात येणार आहे.(Vodafone ची भारतातील सेवा बंद होण्याच्या वाटेवर; कंपनी तोट्यात चालली असल्याचे IANS वृत्त)
कंपनीने ऑल-इन-वन पॅकबाबत बोलायचे झाल्यास 222,333,444 आणि 555 रुपयांना लॉन्च केले आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अतिरिक्त 1 हजार मिनिटांची ऑफर देण्यात आली आहे. लॉन्च करण्यात आलेले हे सर्व प्लॅन विविध वॅलिडिटीस ग्राहकांना उपलब्ध करुन दिले आहेत. रिलायन्स जिओने 149 रुपयांच्या प्लॅनची वॅलिटडिटी कमी करत त्यामध्ये 300 IUC कॉलिंग मिनिट्स दिले आहेत. त्यामुळे युजर्स अन्य नेटवर्कवर सुद्धा कॉलिंग करु शकणार आहेत.