रिलायन्स जिओची शानदार ऑफर! 21 रुपयांच्या रिचार्जमध्ये दुप्पट 4G डेटासह कॉलिंगचा फायदा
Reliance Jio | (File Image)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. देभरातील नागरिकांना येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे बहुतांश लोक घरी बसून बसून मोबाईलवर आपला वेळ घालवताना दिसून येत आहे. त्यामुळे रिलायन्स जिओने ही स्थिती लक्षात घेता त्यांच्या 4G च्या डेटा वाउचर्समध्ये नुकताच बदल केला आहे. कंपनीने त्यांच्या सर्वात स्वस्त डेटा पॅकमधील बेनिफिट्स दुप्पट केले आहेत.

जिओचा 4G डेटा पॅकमध्ये कमीतकमी रुपयांचे वाउचर युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामध्ये 11 रुपये, 21 रुपये आणि 51 रुपयांसह 101 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. तर 21 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलाचे झाल्यास यामध्ये 1 GB ऐवजी आता अनलिमिटेड 2GB डेटा दिला जात आहे. तसेच कॉलिंगसाठी 500 मिनिट्स सुद्धा दिली जाणार आहेत. जे जिओ टू नॉन जिओवर कॉलिंग करण्यासाठी वापरता येणार आहेत.(रिलायन्स जिओचा नवा 'Work From Home Pack'; दररोज मिळणार 2 GB डेटा)

 दुसऱ्या बाजूला 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा देण्यात येत आहे. याची 28 दिवसांची वॅलिडिटी असून यामध्ये प्रतिदिन 100 एसएमएस सुविधा दिली जाणार आहे. कॉलसाठी या प्लॅनसाठी ग्राहकांना जिओ टू जिओ फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिट्स देण्यात येणार आहेत. तसेच जिओच्या अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन ही दिले जाणार आहेत.