Reliance Jio च्या 500 रुपयांवरील प्रीपेड प्लॅनवर युजर्सला मिळणार 5GB पर्यंत डेटा
Reliance Jio (Photo Credit: LinkedIn)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्सला नेहमीच खुश ठेवण्यासाठी नवे प्लॅन कंपनीकडून आणले जातात. तसेच स्वस्त दरात बेस्ट डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग असणारा प्लॅनसुद्धा युजर्सला मिळत आहेत. मात्र सध्या IUC लागू केल्यानंतर जिओ ग्राहकांना त्याचे प्लॅन महाग असल्याचे वाटत आहे. तरीही ग्राहक अद्याप जिओच्या प्लॅन घेण्यास पुढे सरसावत आहेत. कंपनीकडे विविध रुपयांतील प्लॅन उपलब्ध असून काही कॉम्बो प्लॅन्स ही आहेत. तर आता 500 रुपयांवरील रिलायन्स जिओच्या प्लॅनवर खासकरुन 5GB पर्यंत डेटाचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे.

रिलायन्स जिओच्या 509 रुपयांवरील प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 4 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. तसेच ऑनलाईन व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्सला हा प्लॅन शिखाला परवडण्या सारखा आहे. 28 दिवसाची वॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी फ्री कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस ऑफर करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाटठी युजर्सला IUC वाऊचर घ्यावे लागणार आहे. IUC टॉपअप 10 रुपयांपासून ते 1000 रुपयापर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.(Reliance Jio चा पुन्हा एकदा युजर्सला झटका, 'या' प्लॅनच्या वॅलिडिटीत कपात)

यामधील दुसरा प्लॅन म्हणजे 799 रुपयांचा आहे. यामध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिडिटी सोबत 5जीबी डेटा मिळणार आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी युजर्सला आययुसी प्लॅनचे रिचार्ज करावे लागणार आहे. तसेच जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि 100 फ्री एसएमएस सुद्धा दिवसाला युजर्सला पाठवता येणार आहे. तर जिओ युजर्सला 1699 रुपयांचा लॉन्ग टर्म प्लॅन सुद्धा ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनची वॅलिडिटी 365 दिवस असणार असून युजर्सला अन्य सुविधा सुद्धा देण्यात येणार आहेत.