गेल्या काही काळापासून Redmi चा स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरवर आधारीत स्मार्टफोन्स लवकरच बाजारात येणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता Redmi Pro 2 नावाने नवा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल असे बोलले जात आहे. त्यातच आता Redmi चा स्नॅपड्रॅगन 855 वर आधारीत स्मार्टफोन Poco F2 या नावाने भारतात लॉन्च केला जाईल.
चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साईट Weibo ने दिलेल्या माहितीनुसार, या फोन मे किंवा जून मध्ये लॉन्च होण्याची संभावना आहे. हा फोन अगदी Redmi Note 7 प्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे.
Redmi Note 7 फर्स्ट लूक व्हिडिओ:
फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर शिवाय पॉपअप सेल्फी कॅमेरा आणि होल लेस स्क्रीन देण्यात आली आहे. यापूर्वी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Redmi Pro 2 मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेर दिला जाईल. ट्रिपल रिअर कॅमेरासह लॉन्च होणारा हा कंपनीचा पहिला फोन असेल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर देखील असेल. या फिचरसह हा कंपनीचा पहिला फोन असेल.