Redmi Note 7 Pro वर ग्राहकांना 6 हजार रुपयापर्यंत सूट, जाणून घ्या अधिक
Redmi Note 7 Pro (Photo Credits-Twitter)

फोन निर्माता कंपनी शाओमीने 17 फेब्रुवारी पासून Mi Super Sale 2020 सुरु केला आहे. हा सेल येत्या 21 तारखेपर्यंत सुरु राहणार असून यामध्ये शाओमीच्या विविध स्मार्टफोनवर दमदार सूट देण्यात येणार आहे. सेलमध्ये Redmi 8A, Redmi Note 8 Pro, Redmi Go सारखे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही Redmi Note 7 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधी आहे. कारण सेलमध्ये या स्मार्टफोनवर तब्बल 6 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.

Mi Super Sale 2020 मध्ये रेडमी नोट 7 प्रो हा त्याच्या मूळ किंमतीव्यतिरिक्त अन्य ऑफर्ससह खरेदी करता येणार आहे. तुम्ही जर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा उपयोग करुन 5 टक्क्यांची सूट मिळवू शकणार आहात. या स्मार्टफोनमध्ये युजर्सला 4Gb+64Gb स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच फोनवर 1 हजार रुपयांचा Mi Exchange ऑफर सुद्धा मिळणार आहे. रेडमी नोट 7 प्रो भारतीय बाजारात तीन स्टोरेजच्या वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. तर 6Gb+64Gb मॉडेल 10, 999 रुपये आणि 6Gb+128Gb स्टोरेज वेरियंट 13,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ब्लू, ब्लॅक आणि रेड या तीन रंगामध्ये हा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे.(भारतीयांनो तयार रहा; 'या' दिवशी लाँच होणार देशातील पहिला 5G Smartphone Realme X50 Pro; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये)

स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 48MP+5MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 13Mp फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6.3 इंचाचा FHD+Do Notch डिस्प्ले देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठोी यामध्ये 4000mAh ची बॅटरी दिली असून फोन Qualcomm Snapdragon 675 प्रोसेसरपेक्षा कमी आहे. यामध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर सुविधा ही देण्यात आली आहे.