Redmi 9A India Launch (Photo Credits: Redmi Malaysia)

रेडमी 9ए (Redmi 9A) हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आला. आज या स्मार्टफोनचा सेल दुपारी 12 पासून सुरु होणार आहे. Amazon.in आणि Mi.com वर हा फोन विक्रीस उपलब्ध असेल. या सेलअंतर्गत बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) क्रेडीट कार्डवरुन खरेदी केल्यास 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. तर अॅमेझॉन पे युपीआय (Amazon Pay UPI) किंवा नो-कॉस्ट ईएमआय (no-cost EMI) या पर्याय निवडल्यास 150 रुपयांपर्यंत अॅमेझॉन पे कॅशबॅक मिळू शकतो.

रेडमी 9ए मध्ये 6.53 इंचाचा HD+ LCD dot डिस्प्ले आहे. याचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. यात MediaTek Helio G25 SoC चा प्रोसेसर असून 3GB ची रॅम देण्यात आली आहे. तसंच फोटोग्राफीसाठी 13MP चा रिअल कॅमेरा आणि सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 बेस्ड MIUI 12 ऑपरेटिग सिस्टमवर काम करतो. दोन वेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 1. 2GB रॅम + 32GB स्टोरेज. 2. 3GB रॅम + 32GB स्टोरेज. हा स्मार्टफोन ब्लॅक, नॅचर ग्रीन आणि सी ब्लू या रंगात उपलब्ध आहे. (Redmi 9A चा नवा वेरियंट लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक)

प्रोसेसर MediaTek Helio G25 SoC
रॅम  2GB, 3GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 32GB, 32GB
बॅटरी 5000mAh
बॅक कॅमेरा 13MP
सेल्फी कॅमेरा 5MP
चार्जिंग सपोर्ट 10W

Redmi 9A First Online India Sale (Photo Credits: Amazon India)
Redmi 9A India Sale (Photo Credits: Amazon India)

कनेक्टीव्हीटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, a 3.5mm audio jack आणि micro-USB पोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास, याच्या 2GB आणि 32GB या वेरिएंटची किंमत 6,799 रुपये असून 3GB आणि 32GB वेरिएंटची किंमत 7,499 रुपये इतकी आहे.