शाओमी (Xiaomi) कंपनीने रेडमी 9A (Redmi 9A) स्मार्टफोन भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी लॉन्च केला. आज या बजेट स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. हा स्मार्टफोनचा आज दुपारी 12 पासून अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि एम.कॉम (Mi.com) वर सेल सुरु होईल. या सेलमध्ये एचएसबीसी कॅशबॅक कार्डवर (HSBC Cashback Cards) 5% डिस्काऊंट मिळेल. तर अॅमेझॉन पे युपीआयवर (Amazon Pay UPI) 10% आणि अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर (Amazon Pay ICICI Bank Credit Cards) 5% सूट मिळेल. त्याचबरोबर यात नो-कॉस्ट ईएमआयचा देखील ऑप्शन देण्यात येईल.
रेडमी 9A मध्ये 6.53 इंचाचा एचडी+LCD waterdrop notch डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये 13MP चा सिंगल रिअर कॅमेरा AI scene detection, AI portrait आणि pro mode support सह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi India Tweet:
Say hello to #Redmi9A, India's new #DeshKaSmartphone!
😎 6.53 HD+ IPS Display, certified by #TUV
🔋 #5000mAh ELB with 2⃣ day battery life
🚄 High-performance #HelioG25
📸 #13MP AI camera
🤳 #5MP AI selfie camera
₹6⃣7⃣9⃣9⃣ for 2GB+32GB!
₹7⃣4⃣9⃣9⃣ for 3GB+32GB!
Sale on 4th! pic.twitter.com/AVQfYHodIU
— Redmi India - #Redmi9A is here! (@RedmiIndia) September 2, 2020
रेडमी 9A मध्ये MediaTek Helio G25 chipset प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 2GB रॅम + 32GB इंटरनल स्टोरेज आणि 3GB रॅम + 32 GB इंटरनल स्टोरेज. तीन शेड्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. नॅचरल ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक.
रेडमी 9A च्या 2GB आणि 32GB वेरिएंटची किंमत 6,799 रुपये इतकी आहे. तर 3GB आणि 32GB वेरिएंटची किंमत 7,499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल तर सेलची ही संधी अजिबात वाया जावू देऊ नका.