Redmi 10 Prime भारतात लॉन्च; जाणून घ्या सेल, फिचर्स आणि किंमत
Redmi 10 Prime (Photo Credits: Redmi India)

रेडमी 10 प्राईम (Redmi 10 Prime) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून 4GB+64GB आणि 6BG+128GB या दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Amazon.in आणि Mi.com वर ऑनलाईन खरेदीसाठी आहे. Mi Home stores, Mi Studio आणि इतर ऑफलाईन दुकानांमधून तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनचा सेल 7 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.

रेडमी 10 प्राईम या स्मार्टफोनमध्ये MediaTek चा Helio G88 प्रोसेसर दिला असून यामध्ये 4GB/6GB रॅम दिला आहे. यामध्ये 64GB/128GB मेमरी स्टोरेज दिलेला असून तुम्ही यात 128GB पर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड देखील वापरू शकता. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले 1080x2400 च्या स्क्रीन रिझॉल्युशनसह देण्यात आला आहे. यामध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट दिला असून स्क्रीनवर Corning Gorilla Glass 3 देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 OS वर आधारीत MIUI 12.5 वर काम करतो. तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे- Black, Bifrost Blue आणि Astral White. या स्मार्टफोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला असून यामध्ये 50MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 9W चा रिव्हर्स चार्गिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. रेडमी 10 प्राईम या स्मार्टफोनच्या 4GB+64GB व्हेरियंटची किंमत 12,499 रुपये इतकी असून 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.