Realme X7 Pro 5G स्मार्टफोन सेल Flipkart & Realme.com वर सुरु; जाणून घ्या काय आहेत ऑफर्स
Realme X7 Pro 5G (Photo Credits: Realme India)

Realme X7 Pro 5G स्मार्टफोन आता खरेदीसाठी भारतात उपलब्ध झाला आहे. रियलमी ने गेल्या आठवड्यात X7 सिरीजमध्ये रियलमी X7 आणि रियलमी X7 प्रो 5जी या दोन स्मार्टफोनची घोषणा केली होती. हा स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असून आयसीआयसीआय  बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के तर अॅक्सिस बँक कार्ड्सवर 10 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. डेबिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळेल. हा मोबाईल खरेदी करताना तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय किंवा स्टँडर्ड ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकता. यासोबतच एक्सचेंज ऑफरमध्ये या मोबाईलवर 16500 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देखील मिळू शकतो.

रियलमी एक्स 7 प्रो मोबाईलमध्ये 6.55 इंचाचा सुपर AMOLED punch-hole डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याचे रिजोल्यूशन 2400x1080 पिक्सल इतके आहे. यात MediaTek Dimensity 1000+ चिपसेट प्रोसेरस देण्यात आला असून 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.

Realme X7 Pro 5G (Photo Credits: Realme India)

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वार्ड रियल कॅमेरा दिला असून यामध्ये 64MP चा मेन शूटर, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स, 2MP चा मायक्रो शूटर आणि 2MP चा B&W सेन्सर दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. (Realme V15 स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये?)

हा मोबाईल अॅनरॉईड 10 वर आधारित रियलमी UI ऑपरेटिंग स्टिटमवर कॉल करतो. या मोबाईलमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली असून 65W चा सुपरडार्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलं आहे. हा हँडसेट दोन रंगात उपलब्ध आहे- Fantasy आणि Mystic Black. Realme X7 Pro च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29.999 रुपये इतकी आहे.