Realme X3 चा आज Flipkart वर फ्लॅश सेल, दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार विक्री
Reame X3 (Photo Credits: Flipkart)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीचा (Realme) एक जबरदस्त फिचर स्मार्टफोनचे फ्लॅश सेल आज फ्लिपकार्टवर होणार आहे. Realme X3 या स्मार्टफोनचा आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर फ्लॅशसेल सुरु होणार आहे. उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि कॅमेरा लाईफ यामुळे या असंख्य चाहते या स्मार्टफोनची आतुरतने वाट पाहत आहेत. हा स्मार्टफोन 2 वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यात 8GB+128GB स्टोरेज आणि 12GB RAM+256GB स्टोरेज असणार आहेत. याची किंमत अनुक्रमे 27,999 रुपये आणि 32,999 रुपये इतकी असेल.

या स्मार्टफोन वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, Realme X3 च्या 8GB+128GB स्टोरेज मध्ये 6.57 इंचाची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आली असून 120Hz स्मूथ डिस्प्ले देण्यात आली आहे. तसेच यात UIS आणि UIS Max Ultra Image Stabilization आणि Liquid Cooling System देण्यात आली आहे.

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात स्मार्टफोनमध्ये 64MP + 12MP + 8MP + 2MP व 16MP + 8MP ड्यूल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 4200 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- रिलायन्स जिओचे नवे 'JioMeet' HD व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅप लॉन्च, 100 जण एकाच वेळी होऊ शकतात सहभागी; जाणून घ्या कसा वापराल हा अॅप

तर Realme X3 SuperZoom मध्ये 12GB RAM+256GB वेरियंटमध्ये 6.57 इंचाची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आली आहे. 64MP + 8MP + 8MP + 2MP आणि 32MP + 8MP ड्यूल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आली असून 120Hz स्मूथ डिस्प्ले देण्यात आली आहे. तसेच यात UIS आणि UIS Max Ultra Image Stabilization आणि Liquid Cooling System देण्यात आली आहे. 4200 mAh बॅटरी देण्यात आली आहे.