Realme V11s 5G स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला मिळणार हे धमाकेदार फिचर्स
Realme V11s 5G (Photo Credits-Twitter)

Realme ने आपला शानदार स्मार्टफोन Realme V11S 5G हा लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेटसह 6GB रॅम दिला गेला आहे. यामध्ये रॅम वाढवण्याची सुविधा सुद्धा मिळणार आहे. या व्यतिरिक्त रिअलमी वी11 एस 5जी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2021 ला 4 ऑक्टोबर पासून सुरुवात; 'या' ब्रँडच्या प्रॉडक्ट्सवर मिळणार भरगोस सूट)

Realme V11S 5G स्मार्टफोन मध्ये डुअल सिम स्लॉट दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करणार आहे. यामध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे . याची स्क्रिन टू बॉडी रेश्यो 88.7 टक्के आहे. या फोनमध्ये Mali G57 जीपीयूचा वापर केला आहे. या व्यतिरिक्त हँडसेटमध्ये 6GB मध्ये रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे. जो मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

Realme V11s 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात प्राथमिक 13MP प्राथमिक सेन्सर आणि दुसरा 2MP लेन्स आहे. यासोबतच एलईडी लाईटचा सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये एक सेन्सर देण्यात आला आहे, जो फोनच्या पुढच्या बाजूला वॉटर-ड्रॉप नॉचच्या स्वरूपात आहे.(Realme Narzo 50A आणि Narzo 50i स्मार्टफोन्स भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत)

Realme V11s 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये 5 जी, 4 जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट बटणाची सुविधा उपलब्ध असेल. हा सेन्सर फोनच्या पॉवर बटणात ठेवला आहे. या फोनचे वजन 189 ग्रॅम आहे.