Realme Days Sale: फ्लिपकार्टवर 'रिअलमी डेज सेल' झाले सुरू; 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळवा तब्बल 10 हजारांची सूट
Realme X5 50 Pro 5G (Photo Credit: Twitter)

ई- कॉमर्स बेवसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून 'रिअलमी डेज सेल' (Realme Days Sale) सुरु झाले आहे. फ्लिपकार्टवर पाच दिवस हा सेल चालणार आहे. यामुळे स्मार्टफोन चाहत्यांना या सेलमध्ये कमी किंमतीत रिअलमीचे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यात रिअलमी 6 (Realme 6), रिअलमी सी 11 (Realme C11), रिअलमी नार्जो 20 (Realme Narzo 20), रिअलमी एक्स 3 सुपरझूम (Realme X3 Superzoom), रिअलमी एक्स 50 प्रो 5 जी (Realme X50 Pro 5G) अशा स्मार्टफोनचा समावेश आहे. एवढेच नव्हेतर, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक शानदार ऑफर आणि मोबाइल्सवर डिस्काउंट मिळणार आहे. जाणून घेऊया या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर डिस्काउंट आहे.

भारतात रिअलमीने गेल्या वर्षी अनेक स्मार्टफोन बाजारात आणून आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, अनेक लोकांनी रिअलमीच्या स्मार्टफोनला पसंती दर्शवली आहे. रिअलमी स्मार्टफोन कंपनीला सध्या बाजारात असलेल्या कंपनी ओप्पो, व्हिवो, सॅमसंग आणि वनप्लस यासारख्या कंपनींचे आव्हान आहे. या कंपन्यांचे अनेक धमाकेदार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. हे देखील वाचा- Xiaomi चा नवा स्मार्टफोन Redmi Note 9T 5G ची लाँचिंग डेट आली समोर, 'ही' असू शकतात या मोबाईलची खास वैशिष्ट्ये

रिअलमी नार्जो 20-

सेलमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन (6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) 14 हजार 999 रुपयांऐवजी 13 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनवर एक हजार रुपयांची बचत होऊ शकते.

रिअलमी सी 11-

रीअलमी सी 11 च्या 2 जीबी + 32 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटमध्ये 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये आपण हा फोन 8 हजार 999 रुपयांऐवजी 6 हजार 999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकतात.

रिअलमी एक्स 3 सुपरझूम-

सेलमध्ये रिअलमी एक्स3 सुपरझूम हा स्मार्टफोन (8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज) 27 हजार 999 रुपयांऐवजी 23 हजार 999 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच या फोनच्या खरेदीवर 4 हजार रुपयांची बचत होऊ शकते.

रिअलमी 6-

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये रीअलमी 6 च्या 6 जीबी + 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटवर 5 हजारांची सूट मिळत आहे. हा फोन तुम्ही येथे 17 हजार 999 रुपयांऐवजी 12 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

रिअलमी एक्स 50 प्रो 5 जी-

या सेलमध्ये रिअलमी एक्स 50 प्रो 5 जी या स्मार्टफोनवर सर्वाधिक सूट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर 31 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या व्हेरिअंटची किंमत सध्या 41 हजार 999 रुपये आहे. म्हणजेच सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर 10 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

फ्लिपकार्टवर ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे. फ्लिपकार्टवर रिअलमी डेज सेल आजपासून 9 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर ग्राहकांना या स्मार्टफोनवर पुढील ऑफर येऊपर्यंत कोणतीच सूट मिळणार नाही.