रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून UPI Lite द्वारा 500 ऐवजी 1000 रूपयांचा व्यवहार करता येणार आहे तर UPI Lite Wallet Limit देखील 2000 वरून 5000 केल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच UPI 123PAY च्या प्रत्येक व्यवहाराची लिमिट देखील 5 हजार वरून दहा हजार केली आहे. ही व्यवहारामधील मर्यादा वाढवल्याने आता युजर्सना ऑनलाईन व्यवहार करणं अधिक सुकर होणार आहे. आज जाहीर झालेल्या Monetary Policy Meeting मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आरबीआय गर्व्हनर यांच्या स्टेटमेंट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, युपीआय मुळे नागरिकांचा डिजिटल पेमेंटचा अनुभव सुकर झाला आहे. यामध्ये वेळोवेळी बदल करून अनुभव सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आता अधिक ग्राहकांनी त्याचा वापर करावा या उद्देशाने लिमिट मध्येही बदल करण्यात आले आहेत.
युजर्सना ना UPI Lite ची सेवा वापरण्यासाठी UPI Lite Wallet मध्ये काही पैसे भरावे लागणार आहेत. UPI Lite wallet हे यूपीआय अॅप्स BHIM, Google Pay, PhonePe आदी वर उपलब्ध आहे. आता UPI PIN न टाकता UPI Lite Wallet चा वापर करून 2000 पर्यंत व्यवहार करू शकतात तर त्यासाठी UPI Lite Wallet मध्ये 5000 पर्यंत रक्कम भरता येऊ शकते.
NPCI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, UPI Lite साठी Auto-top up facility आहे. म्हणजे UPI Lite balance कमी झाला की त्यामध्ये आपोआप पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. UPI Lite balance limit ची मर्यादा 5000 आहे त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. दरम्यान युजर कोणत्याही क्षणी Auto-top up mandate बदलू शकतात. Major Changes in UPI Payment: कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत, RBI ने युपीआयआमध्ये केले 'हे' दोन मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर .
UPI 123PAY ही फीचर फोन युजर्ससाठीची UPI पेमेंट सुविधा आहे, ज्यांच्याकडे UPI पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन नाहीत. ही सुविधा आता 12 भाषांमध्ये उपलब्ध असून सध्या, UPI123Pay मधील प्रति-व्यवहार मर्यादा रु. 5000 वरून 10,000 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआयला लवकरच आवश्यक निर्देश जारी केले जातील असेही नमूद करण्यात आले आहे.