मोबाईल Privacy बाबत चिंता? या पद्धतीने जाणून घ्या कोणत्या App मधून डेटा लीक होतोय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे डेटाची किंमत आणि चोरी करण्याची प्रकरणे अधिकाधिक वाढत आहेत. नुकत्याच डेटा लीक करण्याचे प्रकरम समोर आल्यानंतर आता युजर्सच्यासमोर त्यांच्या प्रायव्हसी बाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र युजर्सकडून डेटा लीक होण्याच्या प्रकरणापासून बचाव करण्यासाठी अधिक सतर्क झाले आहेत. रिसर्जर्स यांच्या मते जर एखाद्या युजर्सला त्यांचा कोणता डेटा लीक होतोय हे माहिती करुन घेण्याचे विविध मार्ग आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म Kaspersky यांच्याकडून लिहिण्यात आलेल्या एका ब्लॉकमध्ये म्हटले आहे की, बहुतांश अॅपच्या माध्यमातून युजर्सची माहिती एकत्र करतात.

उदाहरण म्हणजे, कोणत्या ही ठिकाणचे नेव्हिगेशन अॅपबाबत काम करण्यासाठी युजर्सच्या लोकेशनची किंवा जीपीएस एक्सेस असणे गरजे असते. याच प्रकारे अन्य अॅप सुद्धा जे उत्तम सर्विसह त्यांच्या डेव्हलेपमेंटचे आकडे एकत्र करण्यास उपयोग करतात. काही डेव्हलपर्स युजर्सच्या माहितीचा फायदा घेत त्याची विक्री केली जाते. यामधून लाखो-करोडो रुपये कमवले जातात.(फेसबुकच्या 5 सीक्रेट ट्रिक्स तुम्हाला माहित आहेत का? घ्या जाणून)

 तर युजर्स काही सर्विसेच्या मदतीने त्यांना कोणती माहिती लीक केली जात असल्याचे समजते. The AppCensus अशी एक सर्विस आहे ज्याच्या माध्यमातून युजर्सची कोणती पर्सनल माहिती लीक करण्याात आली आहे हे सहज समजते.त्याचसोबत लीक केलेली माहिती कोणाला दिली हे सुद्धा कळून येते. हे अॅप कोणत्याही मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते. मात्र या अॅपवर अॅक्टिव्ह असणे गरजे आहे.

>>'या' पद्धतीने करा उपयोग

डेटा एनक्रिप्डेट होण्याच्या स्थितीत हे अॅप युजर्सचा कोणता डेटा मिळवला आहे याची माहिती देते. Exodus Privacy सुद्धा याच पद्धतीने काम करते. AppCensus च्या तोडीसतोड Exodus Privacy अॅप आहे. ही सर्विस अॅप रिक्वेस्ट आणि बिल्ट-इन ट्रॅकर्स दाखवले जाते. दोन्ही सर्विसेस वापरणे अगदी सोपे आहे. या अॅपवर अन्य अॅपचे नाव सर्च करुन त्याबाबत अधिक माहिती मिळू शकते. दोन्ही अॅप त्यांच्या अधिकृत संकेस्थळावरुन किंवा गुगल प्ले स्टोअरवरुन युजर्सला डाऊनलोड करता येणार आहे.