PUBG | (Photo credit: archived, edited, symbolic images)

PUBG Mobile Season 7: अनेक वादविवादांमुळे चर्चेत असलेला, प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरलेला आणि तरुणाईसह लहानथोरांच्या स्मार्टफोनमध्ये अपवाद वगळता हमकास असलेला गेम म्हणजे PUBG Game. असा हा पबजी गेम 15 रोजी संपला. संपला म्हणजे PUBG Mobile Season 6 संपले. पण, म्हणून काही पबजी गेम बंद होणार असे मुळीच नाही. Tencent ने आता पबजी चाहत्यांसाठी हाच गेम PUBG Mobile Season 7 रुपात 0.12.5 व्हर्जनने सुरु होत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार PUBG Season 7 उद्या म्हणजे 17 मे पासून सुरु होत आहे.

पबजी रोल आऊट होण्याबाबत आगोदरच चर्चा

काही दिवसांपूर्वीच PUBG Season 7 मध्ये मिळणाऱ्या आयटमबद्दलची माहिती लिक झाली होती. ही माहिती एका Youtuber मिस्टर घोस्ट गेमिंग ने लीक केली होती. त्या Youtuber ने माहिती देताना सांगितले होते की, PUBG Mobile बिल्ड नंबर 0.12.5 ला 16 मे पासून रोल आऊट करण्यात येईल.

काय असेल PUBG Season 7 मध्ये

दरम्यान, सर्व्हर मेंटेनंन्सनंतर हा गेम ऑनलाईन सुरु होईल. गेमर्स हा नवा सीजन PUBG Season 7 Royale Pass सोबत खेळतील. नव्या सीजनमध्ये पबजी प्लेयर्सना नवी स्कीन, नवी शस्त्रं (Weapons) याबाबत सांगायचे तर, यात Skorpian मशीन पिस्टल मिळेल. जे 9 MM बुलेटने शूट करु शकते, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Pubg Addiction: पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसीड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु)

थोड्याथोड्या वेळाने विश्रांती बंधनकारक

PUBG Mobile ला चीनने अलविदा केल्यानंतर Tencent ने अशाच पद्धतीचा एक Game for Peace रोल आउट केला. ज्यात गेमप्ले मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आले. जो प्लेयर 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. त्याच्यासाठी अॅडवायजरी नोटीस पॉप-अप केले जाते. तसेच या शिवाय गेमप्ले गेमप्ले दरम्यान पॉप-अप-नोटिफिकेशनसुद्धा मिळते. ज्यात गेममध्ये थोड्या थोड्या वेळाच्या अवधीने विश्रांती घेण्यास सांगण्यात येते.