भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. मात्र सध्या देशातील सरकारने माध्यमे विकत घेतल्याची तक्रार होत आहे. सोबतच अशी अनेक पेजेस, वर्तमानपत्रे, वाहिन्या आहेत ज्यांची सत्य बोलल्याने सरकारकडून गळचेपी केली जात आहे. नुकताच याचा प्रत्यय आला, जेव्हा ट्विटरने Trueindology हे अकाऊंट केंद्रातील एक निलंबित सनदी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून बंद केले. या खात्याला लाखो लोक फॉलो करत होते. अचानक हे खाते बंद झाल्याने युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे. ऑप इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
Here it is @TrueIndology himself predicted it pic.twitter.com/LTZsWxfgzd
— Chowkidar NationFirst (@prakharevol) April 29, 2019
Trueindology यांचे ट्विटर आणि फेसबुक खाते हे फारच लोकप्रिय आहे. इतिहासाबाबत पसरलेल्या चुकीच्या गोष्टी, दाखले यांची पोलखोल या खात्याद्वारे केली जाते. समाजातील काही ठराविक घटकांनी आपल्याला हवे तसा इतिहास बदलला, फिरवला आणि लोकांसमोर मांडला. मात्र याबाबत संशोधन करून, विश्लेषण करून Trueindology लोकांसमोर सत्य मांडत असे. मात्र निलंबित सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी हे अकाऊंट त्यांचे संपर्क वापरून बंद करून टाकले. (हेही वाचा: Twitter सादर करणार नवे फिचर; tweet edit करणे होणार शक्य)
जोशी यांनी शेरवान आणि शेरवानी यांच्यासंदर्भात एक ट्विट केले होते. मात्र Trueindology ने ते ट्विट आणि माहिती चुकीची असल्याचे सांगितले होते. यामुळे बिथरलेल्या जोशी यांनी हे खाते बंद बंद करण्याची धमकी दिली होती. शेवटी आता ट्विटरने हे खाते बंद केले आहे. यामुळे संतप्त झालेल्या युजर्सकडून #bringbackTrueIndology हा ट्रेंड चालवला जात आहे. या आधीही एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यामध्ये म्हटले होते की गरकनाथ मंदीर हे मुस्लिम शासकाने दान दिले होते. ही पोस्ट खोटी असून त्यातील तथ्ये खोटी आहेत हे Trueindology ट्विटर हँडलने पुराव्यानिशी दाखवून दिले होते. तेव्हाही हे खाते काही दिवसांसाठी बंद करण्यात आले होते.