Twitter सादर करणार नवे फिचर; tweet edit करणे होणार शक्य
Archived, Edited, Representative images | (Photo Credit: File Photo)

ट्विट (Tweet) करताना अनेकदा आपल्याकडून काही चूका होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला टॅग करणे, आवश्यक हॅशटॅग वापरणे, स्पेलिंग मिस्टेक, व्याकरणाच्या चुका अशा विविध प्रकारच्या चुका आपल्याकडून झाल्या असतील किंवा होत असतील. अशावेळी चूक लक्षात येताच आपल्याला ट्विट डिलिट करुन पुन्हा नव्याने ट्विट करावे लागते. मात्र आता ही अधिकची मेहनत घ्यावी लागणार नाही.

कारण आता ट्विट एडिट (tweet edit) करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ट्विटर लवकरच हे नवं फिचर सादर करणार आहे. त्यामुळे ट्विट करणे अधिक सोपे, सुकर होणार आहे.

याबद्दल ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्से (Twitter CEO Jack Dorsey) यांनी सांगितले की, "आम्ही ट्विटरमध्ये लवकरच 5 ते 30 सेकंदाचे 'डिले फिचर' आणत आहोत. त्यामुळे या वेळात तुम्हाला ट्विट एडिट करता येईल. मात्र या वेळेत ट्विट एडिट न केल्यास पुन्हा ते ट्विट एडिट करता येणार नाही. तसंच यामुळे ओरिजनल ट्विट सोबत एडिट केलेलं ट्विटही लोकांना दिसेल."