भारतीय बाजारात सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला Poco कंपनीचा नवा स्मार्टफोन Poco X3 हा 22 सप्टेंबर भारतात लाँच झाला. 6000mAh बॅटरी लाईफ (Battery Life) सह जबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला विक्रीसाठी कधी उपलब्ध होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. ही प्रतिक्षा आज संपणार असून दुपारी 12 वाजता ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) आज हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आज या स्मार्टफोनचा भारतात पहिला फ्लॅशसेल होणार आहे. हा स्मार्टफोन 3 वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात प्रत्येक 2 रंग उपलब्ध आहेत. यात 6GB रॅम (RAM) आणि 64GB स्टोरेजची (Storage) किंमत 16,999 रुपये, 6GB+128GB ची किंमत 18,999 रुपये आणि 8GB+128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Poco X3 स्मार्टफोन फ्लिपकार्टवरुन खरेदी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही Flipkart Axis Bank Credits Card ने पेमेंट करत असाल तर 5 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. तसेच याच्या 6GB रॅम (RAM) आणि 64GB स्टोरेज वेरियंटसाठी 1889 रुपये तर, 6GB+128GB साठी 2056 रुपये आणि 8GB+128GB साठी 2223 रुपयांचा नो कॉस्ट EMI भरावा लागणार आहे. WhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित
या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाची फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे जी 120 हर्टज सह येते. हा अॅनड्ऱॉईड 10 वर आधारित MIUI 12 वर काम करतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. Qualcomm Snapdragon 732G SoC मिळत आहे. यात जो Adreno 618 GPU आणि 8GB पर्यंतच्या रॅमसह येतो.
तसेच यात 64MP Sony IMX682 देण्यात आला आहे. यात 13MP चा वाइड एंगल लेन्स, एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एक 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स दिला आहे. फ्रंटमध्ये यूजर्सला पंच होल कटमध्ये 20MP चा लेन्स मिळत आहे.तर कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth, 4G, GPS/ A-GPS, IR Blaster, NFC, 3.5mm headphone jack, आणि USB Type-C port चार्जिंग पोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते जी 33 वॉट च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.