Poco X3 (PC - Twitter)

पोको (POCO) कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोनस पोको एक्स 3 (POCO X3) काल भारतात लॉन्च झाला आहे. पोको एक्स 3 ला लॉन्च होऊन 2 दिवस उलटले नाहीत तर, कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत घशघशीत कपात केली आहे.या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 16 हजार 999 रुपये इतकी होती. मात्र, कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 2 हजारांनी कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 14 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत अधिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे अनेकांना हा स्मार्टफोन आकर्षित करण्याची शक्यता आहे.

पोको एक्स 3 16 हजार 999 रुपयांत (6 जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेज) लॉन्च झाला होता. मात्र, आता हाच स्मार्टफोन 14 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. याचबरोबर कंपनीने 8 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज असलेल्या स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मात्र, कंपनीकडून या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही. तसेच या स्मार्टफोनच्या किंमतीतही घट झाली की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

पोको एक्स 3 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + (2400 x 1800 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. जो डीआर 10, 450 निट ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येत आहे. फोनमध्ये सेंटर पंच होल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरसह आला आहे. हे देखील वाचा- Redmi Note 10 Pro चा आज दुपारी 12 वाजता सेल, जाणून घ्या किंमतीसह खासियत

फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचे मुख्य लेन्स 64 मेगापिक्सल आहेत. या व्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि मॅक्रो आणि डेप्थ सेंसिंगसाठी दोन 2 मेगापिक्सल सेन्सर आहेत. समोर 20 एमपी कॅमेरा आहे. पोकोचा हा फोन 6 हजार एमएएचची शक्तिशाली बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. जो 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर्स, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ड्युअल-बँड वाय-फाय एसी, ब्लूटूथ व्ही 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.