Poco F2 (Photo Credit - Twitter)

Xiaomi चा सब-ब्रँड पोको (Poco) लवकरचं एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. नवीन स्मार्टफोन Poco F1 स्मार्टफोनची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल, जी Poco F2 म्हणून ओळखली जाईल. पोको एफ 1 स्मार्टफोन वर्ष 2018 मध्ये लाँच झाला होता. तब्बल 2 वर्षानंतर कंपनी Poco F2 ची अपग्रेड केलेली आवृत्ती बाजारात आणणार आहे. ट्वीटरवर Poco F2 चा अधिकृत टीझर प्रसिद्ध झाला आहे.

Poco F2 संभाव्य स्पेसिफिकेशन्स -

Poco F2 स्मार्टफोन सुरुवातील 20,000 रुपये किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. लीक झालेल्या अहवालानुसार, पोको एफ 2 मॉडेल नाव K9A आणि कोडनेम Courbet सह सूचीबद्ध आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर सपोर्टसह येईल. यात 4250mAh बॅटरी आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एक क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो वाइड अँगल लेन्स, अल्ट्राव्हायोलेट एंगल लेन्स आणि मॅक्रो लेन्स आणि डीपथ सेन्सर सपोर्टसह येईल. फोनमध्ये अमोलेड डिस्प्ले सपोर्ट आहे. जे 120 हर्ट्झ रिफ्रेश्ड रेट सपोर्टसह येईल. याशिवाय फोनमध्ये एनएफसी सपोर्टही उपलब्ध असेल. (वाचा - Vivo Y20A ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत)

Poco F1 स्पेसिफिकेशन्स -

शाओमी Poco F1 मध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले मिळेल, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18.7: 9 असेल. या फोनमध्ये स्क्रीनला ब्रेक होण्यापासून वाचवण्यासाठी गोरिल्ला ग्लास 3 चा वापर करण्यात आला आहे. पोको एफ 1 च्या मागील पॅनेलवर आपल्याला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा प्राथमिक सेन्सर 12 एमपी आहे आणि सेकंडरी सेन्सर 5 एमपी आहे. मागील कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅशसह येईल. पोको एफ 1 च्या फ्रंट पॅनेलमध्ये 20 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. पोको एफ 1 स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 4000mAh बॅटरी सपोर्टसह येईल.