फोटोग्राफी शिकणाऱ्यांसाठी Amazon वर कॅमेराच्या किंमतीत जबदरस्त सूट
Sony Camera (Photo Credits-Twitter)

अमेझॉन स्पेशल अंतर्गत फोटोग्राफीची आवड असणाऱ्या आणि शिकणाऱ्यांसाठी Sony कंपनीच्या कॅमेऱ्यासाठी जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. Sony Alpha 5100L या कॅमेऱ्यावर शिकणाऱ्यांसाठी मिररलेस कॅमेऱ्यावर सूट देण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही फोटोग्राफीच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेणार असाल तर सुरुवातीच्या काळासाठी हा कॅमेरा उत्तम ठरु शकतो. अॅमेझॉनवर युजर्सने या कॅमेऱ्यासाठी 4.5 स्टार रेटिंग दिली आहे. या कॅमेऱ्याची खरी किंमत 38690 असून अॅमेझॉनवर 16 टक्के सूट सोबत 32399 रुपयात खरेदी करता येणार आहे.

लाइटनींग डील अंतर्गत सोनी कंपनीचा हा कॅमेरा अधिक कमी किंमतीत म्हणजेच 30990 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचसोबत कॅमेऱ्यावर 2 वर्षांची गॅरंटी देण्यात येणार आहे. आतापर्यंत 40 टक्के लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. हा कॅमेरा तुम्हाला 1459 रुपयांच्या EMI वर सुद्धा खरेदी करता येणार आहे.(खुशखबर! Nokia 4.2 स्मार्टफोन मिळतोय अर्ध्या किंमतीत; पाहा कुठे मिळतेय ही भन्नाट ऑफर)

ISO: 100-25600 रेंज, इमेज प्रोसेसर: 179 ऑटोफोकस पॉइंट्सह BIONZ X, Full HD व्हिडिओ रिझोल्युशनसह मॅन्युअल कंट्रोल देण्यात आला आहे. तर फ्रेम रेट्स, Wifi, NFC आणि बिल्ट इन ब्लूटूथ अशी या कॅमेऱ्याची खासियत आहे. हा कॅमेरा तुम्हाला हेडफोन्ससह सुद्धा खरेदी करता येणार आहे. Sony A5100L हा कॅमेरा ट्रॅव्हलर्ससाठी उत्तम ऑप्शन ठरु शकते. याची रोटिंग स्क्रिन vloging  आणि सेल्फीसाठी मदत करणार आहे. या कॅमेऱ्याच्या बिल्ट-इन-पॉप-अप फ्लॅश  कमी लाईटमध्ये शुटिंग करण्यासाठी चांगला ऑप्शन आहे.