Paytm (Photo Credits: ANI)

पेटीएमने (Paytm) व्यवसाय क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. पेटीएम पुढील वर्षी मार्च महिन्यांपर्यंत दुकानदारांना 1 हजार कोटींचे कर्ज वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुकानदार कर्ज कार्यक्रमाच्या अंतर्गत पेटीएमने बिझनेस ऍप्स वापरकर्त्यांसाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज देण्यास सुरु ठेवेले, असे सांगितले आहे. सध्या आपल्या कडे 1.7 कोटी दुकानदार आहेत. याच आकडेवारीनुसार, व्यवसाय क्षेत्राला 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाच्या रकमेद्वारे दुकानदार आपल्या व्यवसायाचे डिजिटल करु शकतील. यामुळे दुकानदारांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि डिजिटल भारत मोहिमेत सहभागी होण्यास त्यांना मोठी मदत मिळेल, असेही पेटीएमने सोमवारी सांगितले आहे.

मार्चपर्यंत एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पेटीएम दैनंदिन व्यवहाराच्या आधारे दुकानदारांची पत योग्यता निश्चित करते आणि त्यानंतर नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि बँकांच्या भागीदारीत असुरक्षित कर्ज प्रदान करते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) वाढीसाठी कमी व्याज दरावर पाच लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी-मुक्त कर्जाची वाढ करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या कर्जाची वसुली पेटीएमसह दुकानदाराच्या दैनंदिन सेटलमेंटच्या आधारे केली जाते आणि अकाली देयकेवर कोणतीही फी आकारली जात नाही. गेल्या आर्थिक वर्षात 1 लाखाहून अधिक व्यापारी भागीदारांना 550 कोटी रुपयांची कर्जे दिली असल्याचा पेटीएमचा दावा आहे. हे देखील वाचा- भारतात चिनी गुंतवणूक असलेल्या Big Basket च्या दोन कोटी ग्राहकांचा खासगी डेटा लीक

पेटीएम लेंडिगचे सीईओ भावेश गुप्ता म्हणाले की, कंपनी गॅरंटीशिवाय तसेच कोणतीही वस्तू गहाण न ठेवता छोट्या व्यापाऱ्यांना आणि एमएसएमईला खूप कमी व्याजदरात 5 लाख रुपयांपर्यंत इंस्टट लोन देण्यात येणार आहे. पेटीएमची मोहीम अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या कर्जाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पेटीएमच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येणार आहे.