Oppo Reno 5 5G (Photo Credits: Facebook)

मार्केटमध्ये सध्या 5 G फोन्सची धूम आहेत. यात ओप्पो चा सर्वात पहिले 5G फोन्स लॉन्च केले आहेत. Oppo च्या Reno सिरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 5G) आणि ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 Pro 5G). या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच याची किंमत नेमकी किती आहे. जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोन्सच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल... (Oppo A33: खुशखबर! ओपो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन 'ओपो ए 33' च्या किंमतीत मोठी घट)

Oppo Reno 5 5G फिचर आणि किंमत:

Oppo Reno 5 5G च्या 8GB+128GB मॉडेलची किंमत 30,400 रुपये असून 12GB+256GB वेरिएंटची किंमत 33,700 रुपये आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. ऑरोरा ब्लू, मूनलाइट नाइट आणि स्टार्री नाइट.

ओप्पो रेनो 5 5जी या अॅनरॉईड फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट अूसन अॅनरॉईड 11 वर आधारित  ColorOS 11.1 वर काम करतो. या फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 90 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट सह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देम्यात आला आहे. यात स्पॅनड्रॅगन 765जी प्रोसेसर असून 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी चा मेमरी स्टोरेज देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईल्ड एंगल सेंसर, 2MP चा मायक्रो सेन्सर आणि 2 MP चा पोट्रेट लेन्स देण्यात आला आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 4300mAh ची बॅटरी दिली असून 64 व्हॅटचा फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Oppo Reno 5 Pro 5G फिचर आणि किंमत:

Oppo Reno 5 Pro 5G च्या 8GB+128GB मॉडेलची किंमत 38,200 रुपये असून 12GB+256GB वेरिएंटची किंमत 42,700 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन देखील Oppo Reno 5 5G प्रमाणे 3 रंगात उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये अॅनरॉईड 11 वर आधारीत ColorOS 11.1 आहे. यात 6.55 इंचाचा फुल एचडी+ ओलेड डिस्प्ले  90 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट सह देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये मीडियाटेकचा डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर देण्यात आला असून 12 जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा मेमरी कॅमेरा दिला असून 8MP चा अल्ट्रावाईल्ड एंगल कॅमेरा आणि 2MP मायक्रो शूटर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,350 mhA ची बॅटरी दिली असून 65 व्हॅटचा फास्ट चार्गिंग सपोर्ट दिला आहे.

दोन्ही फोनची प्री-बुकिंग चीनमध्ये सुरु झाली असून 18 डिसेंबरपासून शीपिंगला सुरुवात होईल. दरम्यान, हे स्मार्टफोन्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये कधी उपलब्ध होतील, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.