Oppo Find X3 Pro (Photo Credits: Voice x Evan Blass)

Oppo Find X3 Series Likely To Be Launched on March 11: चीनची दिग्गज टेक कंपनी ओपोने आपली बहुचर्चित फाइंड एक्स 3 सिरिज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ही स्मार्टफोन सीरिज येत्या 11 मार्चला देशांतर्गत बाजारात येण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये फाइंड एक्स 3 (Oppo Find X3), ओपो एक्स 3 प्रो (Oppo X 3 Pro), ओपो एक्स 3 निओ (Oppo X 3 Neo) आणि ओपो एक्स 3 लाइट (Oppo X 3 Lite) हे 4 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, फाइंड एक्स 3 सीरिज संबंधित कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ओप्पो फाइंड एक्स 3 सीरिजचा लॉन्चिंग प्रोग्राम 11 मार्च 2021 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर हा कार्यक्रम थेट पाहता येणार आहे. हे देखील वाचा- Google वर 'या' गोष्टी कधीच सर्च करु नका अन्यथा होईल मोठे नुकसान

अलीकडेच एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये ओपो फाइंड एक्स 3 सीरिजच्या किंमती आणि रंग पर्यायांबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार फाइंड एक्स 3 प्रो 5 जी चे 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेल 1,000-1,200 युरो म्हणजेच सुमारे 89,000-1,07,000 रुपयांच्या किंमतीवर लाँच होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू, ऑरेंज आणि व्हाइट या 4 रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. ओपो फाइंड एक्स 3 निओच्या 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 700-800 युरो म्हणजेच सुमारे 62,000-71,000 रुपयांपर्यंत असू शकते. ही सीरिज 31 मार्चपासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या सीरिजची विक्री 14 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

ओपो फाइंड एक्स 2 गेल्या वर्षी जूनमध्ये बाजारात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 64,990 रुपये इतकी आहे. ओपो फाइंड एक्स 2 मध्ये 6.7 इंचाची क्यूएचडी + एमोलेड अल्ट्रा व्हिजन डिस्प्ले आहे. हे पंच-होल डिस्प्लेसह येते. फोनवर गोरिल्ला ग्लास 6 चे संरक्षण देण्यात आले आहे. हे 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देखील येते. फोनचा सिरेमिक व्हेरिएंट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.