स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो (Oppo) आपला नवीन जबरदस्त फिचर स्मार्टफोन Oppo F15 भारतात लाँच केला आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन 27 जुलै म्हणजेच उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोन ओप्पो कंपनी आकर्षक ऑफर्स देत आहेत. 27 जुलैपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बाजारात हा विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. या स्मार्टफोनची किंमत 16,990 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या 2 प्रकारात बाजारात उपलब्ध आहे.
हा स्मार्टफोन स्टँडर्ड चार्टेड बँक, बँक ऑफ बड़ोदा, फेडर्ल बँकच्या ग्राहकांना EMI आणि कॅशबॅक ऑफर मिळत आहे. WhatsApp Chats जुन्या मोबाईलमधून नवीन फोनमध्ये आणण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्प्या स्टेप्स
या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.4 इंचाची अमोल्ड डिस्प्ले फुल HD+ सह देणार आली आहे. याचा डिस्प्ले टू बॉडी रेश्यो 90.7% आहे आणि एस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिली गेली आहे. या फोनमध्ये MediaTek Helio P70 चिपसेटसह ARM Mali G72 GPU सह दिली गेली आहे. याचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवले जाऊ शकतो.
यात 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे. इतर दोन सेंसर प्रत्येकी 2MP चे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 4.2, GPS, USB-,C आणि 3.5mm ऑडियो जॅक दिला गेला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा आहे.