OPPO A93 5G चीनमध्ये लाँच, जबरदस्त बॅटरी आणि कॅमेरा फिचर असलेल्या या स्मार्टफोनची काय आहे किंमत?
OPPO A93 5G (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो (Oppo) ने आपला नवा स्मार्टफोन Oppo A93 हा 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. लवकरच हा फोन भारतात लाँच होईल. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरी आणि कॅमेरा फिचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन (QualComm Snapdragon) 480 देण्यात आला आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह देण्यात आला आहे. या कंपनीची वैशिष्ट्ये पाहून हा फोन भारतात येताच रियलमी, रेडमी, वनप्लस च्या स्मार्टफोन्सला चांगलीच टक्कर देईल.

हा फोन दोन वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 1999 युआन (जवळपास 22,600 रुपये) इतकी आहे. त्याचबरोबर याचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंट देखील लाँच करण्यात आला आहे. मात्र याची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही.हेदेखील वाचा- NetFlix ने नववर्षाच्या सुरुवातीला केली मोठी घोषणा! दर आठवड्याला प्रदर्शित करणार नवीन चित्रपट, वाचा सविस्तर

Oppo A93 5G स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची FHD डिस्प्ले आहे. यातील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने तुम्ही वाढवूही शकता. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा प्रायमरी सेंसर, 2MP चा पोर्टेट लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेंसरचा सुद्धा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

Oppo A93 5G च्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर याफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या बाजूला देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 3.5mm चा ऑडियो जॅकसुद्धा देण्यात आला आहे.