Oppo A53s Smartphone (Photo Credits: Oppo Mobile India)

ओप्पो (Oppo) मोबाईल कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन ओप्पो ए53एस (Oppo A53s) 27 एप्रिलला भारतात लॉन्च केला. या 5G स्मार्टफोनचा सेल आज (रविवार, 2 मे) दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट (Flipkart) वर सुरु होणार आहे. ओप्पो ए53एस हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. या मोबाईलच्या 6 जीबी रॅम+128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. तर 8जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 16,990 रुपये इतकी आहे. या सेल अंतर्गत एचडीएफसी बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 1250 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. यासोबतच फ्लिपकार्ड एक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5 टक्के डिस्काऊंट मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला असून त्यामध्ये एचडी+ रिजोल्यूशन दिले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Diamensity 700 chipset प्रोसेसर दिला असून 6 जीबी आणि 8 जीबी अशा रॅममध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये 128 जीबी चा इंटनरल स्टोरेज देण्यात आला आहे. हा मोबाईल अॅनरॉईड 11 वर आधारीत 11.1 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. (धमाकेदार स्मार्टफोन Oppo A 53 अडीच हजारांनी झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर)

OPPO India Tweet:

फोटोग्राफीसाठी या मोबाईलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2 MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून 10W चा चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे.