Oppo A52 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो ने आपला नवा स्मार्टफोन Oppo A52 भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 17 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन काळा आणि पांढरा या 2 रंगात उपलब्ध होईल. या स्मार्टफोनचे खास आकर्षण म्हणजे यात 4 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत तसेच पंच होल कटआऊट वाला डिस्प्ले सुद्धा देण्यात आला आहे. याच्या आकर्षक वैशिष्ट्यांमुळे ओप्पो चे अनेक चाहते या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहात आहे. या स्मार्टफोनची किंमत 16,990 रुपये आहे. ही किंमत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची आहे.

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात 6.5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. या फोनचे रिझोल्यूशन 2400x1080p इतके आहे. यात फुल एचडी सह पंच होल डिझाईन देण्यात आले आहे. कंपनीने या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 SoC देण्यात आली आहे. स्मार्टफोन मध्ये Adreno 610 GPU सुद्धा आहे. भारतात लाँच झालेल्या Oppo A12 स्मार्टफोनची 'ही' जबरदस्त वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही व्हाल हैराण, 10 जूनपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 12MP चा प्रायमरी सेंसर 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा पेअर आहे. त्याशिवाय 2-2 मेगापिक्सेलसह डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॅमे-यासह 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटुथ 5, GPS/ GLONASS आणि USB Type-C देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात 18 वॅटची फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.