Oppo A15s स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत, वेरिएंट सह पहा काय आहे खासियत
Oppo A15s India Launch (Photo Credits: Satwik680 Twitter)

चायनीज कंपनी ओप्पो ने Oppo A15s स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. 21 डिसेंबरपासून अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि इतर रिटेल चॅनल्सवरुन या फोनच्या विक्रीला सुरुवात होईल. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे- डायनॅमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाईट आणि रेनबो सिल्वर. विशेष म्हणजे आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), फेडरल बँक (Federal Bank) यांच्या क्रेडिट, डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास 5 टक्के सूट मिळेल. तर एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट, डेबिट कार्ड वरुन खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळेल. त्याचबरोबर सहा महिन्यांपर्यंत एएमआयचा (EMI) पर्याय खुला असेल.

Oppo A15s मध्ये 6.52 इंचाचा एचडी+डिस्ल्पे देण्यात आला असून त्यात  MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यात 4GB रॅम आणि 64GB चा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपर रिअर कॅमेरा देण्यात आाला असून 13 MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा माक्रो शूटर  आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसंच सेल्फी कॅमेऱ्यासाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (Oppo Reno 5 5G आणि Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन्स लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

Oppo A15s (Photo Credits: Twitter)

या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसंच यात 4,230mAh ची बॅटरी असून हा फोन ColorOS 7.2 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कनेक्टीव्हीसाठी यात वायफाय, ब्युट्युथ, जीपीएस, rear-mounted fingerprint sensor यांसारखे फिचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 11,490 रुपये इतकी आहे.