सह-संस्थापक आणि बोर्ड सदस्य इल्या सुत्स्केव्हर यांच्यासह शेकडो OpenAI कर्मचाऱ्यांनी, OpenAI मधील उर्वरित बोर्ड सदस्यांच्या राजीनाम्याचे आवाहन करणाऱ्या पत्रावर एकत्रितपणे स्वाक्षरी केली आहे. वायर्ड आणि कारा स्विशर यांनी सोमवारी सकाळी दिलेल्या वृत्तानुसार, सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील मायक्रोसॉफ्टमध्ये हे कर्मचारी नवीन उपक्रमात सामील होण्याचा पर्याय निवडू शकतात, अशी चर्चा सुरु होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच ही मागणी पुढे आली आहे. सॅम ऑल्टमन यांना अविश्वासाच्या कारणास्तव एआयच्या सीईओ पदावरुन हटवल्यानंतर या घडामोडी घडू लागल्या आहेत.
505 OpenAI कर्मचार्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र, विद्यमान मंडळाच्या कृतींवरील सामूहिक असंतोषावर असंतोषाला वाट मोकळी करुन देण्याचा प्रयत्न करत आहे. आरोप आहे की OpenAI ची प्रभावीपणे देखरेख करण्यास ते (सॅम ऑल्टमन) असमर्थ आहेत. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ओपनएआयमधील महत्त्वपूर्ण व्यक्तींचा समावेश आहे. जसे की माजी अंतरिम सीईओ मीरा मुराती. ओपनएआय सीओओ ब्रॅड लाइटकॅप, मुराती यांची अलीकडेच ट्विचचे सह-संस्थापक एमेट शीअर यांनी बदली केली आहे. दरम्यान, या पत्राला सोशल मीडियावरील असंख्य OpenAI कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा मिळाला आहे. ज्याने OpenAI ची ताकद त्यांच्या लोकांमध्ये आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या घडामोडी ओपनएआयमधील अंतर्गत तणाव आणि चिंता अधोरेखित करतात, ज्यामुळे संस्थेचे नेतृत्व आणि भविष्यातील दिशा यावर प्रश्न निर्माण होतात.
एक्स पोस्ट
Breaking: 505 of 700 employees @OpenAI tell the board to resign. pic.twitter.com/M4D0RX3Q7a
— Kara Swisher (@karaswisher) November 20, 2023
ओपन एआयमध्ये सुरु असलेल्या संस्थांत्मक घडामोडींबद्दल CNN ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 505 कर्मचाऱ्यांनी कंपनीला इसारा दिला आहे की, ते मायक्रोसॉफ्टच्या नवीन उपकंपनीकडे जातील. ज्यांचे ऑपरेशन ओपनएआयचे पदच्युत मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि माजी अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांच्याकडे असेल. मायक्रोसॉफ्टनेही असंतुष्ट ओपनएआय कर्मचार्यांना आश्वासन दिले आहे की सॅम ऑल्टमनच्या अंतर्गत स्थापन झालेल्या नवीन उपकंपनीमध्ये त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध असतील, जर त्यांनी संक्रमणाचा निर्णय घेणार असतील.
एक्स पोस्ट
Hundreds of #OpenAI employees, including co-founder Ilya Sutskever, have signed a letter demanding that either OpenAI’s remaining board members resign or those OpenAI employees will join Sam Altman’s new venture at Microsoft, Wired and Kara Swisher reporthttps://t.co/bcdavISu6B pic.twitter.com/Ft5eRv8tSO
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) November 20, 2023
दरम्यान, ओपनएआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटबॉट सेन्सेशन चॅटजीपीटीमागील टेक फर्मच्या कर्मचाऱ्यांनी, कंपनीच्या संचालक मंडळाने पायउतार होण्यास अयशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणावर राजीनामा इशारा दिल्याने संस्थेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वाचकांच्या माहितीसाठी असे की, संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, ओपनएआय ही एक खाजगी संशोधन प्रयोगशाळा आहे ज्याचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकसित करणे आणि संपूर्ण मानवतेला लाभदायक मार्गाने निर्देशित करणे आहे. कंपनीची स्थापना एलोन मस्क, सॅम ऑल्टमन आणि इतरांनी 2015 मध्ये केली होती आणि तिचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे आहे.