OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर
OnePlus (Photo Credits-Twitter)

वनप्लसचा नवा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड 2 5G (OnePlus Nord 2 5G) ग्राहकांसाठी अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. या शानदार स्मार्टफोनचा सेल 12 वाजता सुरु झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन खरेदी केल्यास बंपर डिस्काउंट आणि आकर्षक डिल्स मिळणार आहेत. ऐवढेच नव्हे तर फोनवर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर ही मिळणार आहे. तर जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 2 5जी च्या किंमतीसह यावर मिळणाऱ्या ऑफरबद्दल अधिक माहिती.(मोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक)

स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल्यास 10 टक्के डिस्काउंट आणि 1TB क्लाउड स्टोरेजची सुविधा दिली गेली आहे. त्याचसोबत फोनवर 14,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर ही मिळत आहे. या व्यतिरिक्त फोन 1412 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर सुद्धा खरेदी करु शकता. तर खरेदीपूर्वी जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत.

-OnePlus Nord 2 5G के 6GB रैम + 128GB स्टोरेज वेरिए किंमत 27,999 रुपये

-OnePlus Nord 2 5G के 8GB रैम + 128GB स्टोरेज वेरिएंट किंमत 29,999 रुपये

-OnePlus Nord 2 5G के 12GB रैम + 256GB स्टोरेज वेरिएंट किंमत 34,999 रुपये

वन प्लस नॉर्ड 2 5जी स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित OxygenOS ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. यामध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रेजॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. तसेच आस्पेक्ट रेश्यो 90Hz असणार आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 AI प्रोसेसर आणि GPU चा सपोर्ट दिला आहे.(काय सांगता? आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material)

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लैस आहे. याचा प्रायमरी सेंसर 50MP चा आहे. तर यामध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP ची मोनोक्रोम लेन्स दिली आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ आणि सेल्फीसाठी 32MP चा Sony IMX615 सेंसर मिळणार आहे. तसेच याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास ती 5000mAh ची दिली आहे. जी Warp Charge 65W तंत्रज्ञानाला सपोर्ट करणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5G, 4G, LTE, वायफाय6, ब्लुटूथ, जीपीएस, नेवआयसी, एनएफसी आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत.