OnePlus 10 Pro in India: आला रे आला! मोठ्या प्रतीक्षेनंतर वन प्लस 10 प्रो भारतामध्ये लॉन्च; जाणून किंमत व कधी सुरु होणार विक्री
OnePlus 10 Pro (Photo Credits: OnePlus)

दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर वन प्लसने (One Plus) ने अधिकृतपणे आपला फ्लॅगशिप फोन वन प्लस 10 प्रो (One Plus 10 Pro) भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने आपल्या एका व्हर्च्युअल लॉन्च इव्हेंट अंतर्गत हा फोन सादर केला. कंपनीने याआधीच OnePlus 10 Pro चीन आणि जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन फोन OnePlus 9 Pro चा सक्सेसर फोन आहे. OnePlus ने आज आपल्या फोनसह आणखी दोन नवीन उत्पादने सादर केली आहेत. ज्यामध्ये OnePlus Buds Pro नवीन कलर एडिशन आणि OnePlus Bullets Wireless Z2 चा समावेश आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 5 एप्रिल 2022 रोजी होईल.

OnePlus Budt Pro ची किंमत 9,990 रुपये आहे. ज्याची विक्रीदेखील 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, नव्याने लॉन्च केलेल्या OnePlus Bullets Wireless Z2 ची किंमत 1999 रुपये आहे.

OnePlus 10 Pro च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.67-इंचाचा QHD Plus OLED पॅनल आहे, जो LTPO 2.0 पॅनेल सह येतो. यात 120hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. या फोनचा स्पीड वाढवण्यासाठी कंपनीने नेहमीप्रमाणे यावेळी क्वालकॉमचा लेटेस्ट प्रोसेसर वापरला आहे. या प्रोसेसरचे नाव Snapdragon 8 Gen 1 आहे. हा प्रोसेसर 12 GB रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो.

कॅमेरा-

OnePlus 10 Pro च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे, तर 50 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. तसेच तिसरा कॅमेरा 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फ्रंटला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, कॅमेरा सॉफ्टवेअरमध्ये नवीन हॅसलब्लॅड मास्टर स्टाईल (Hasselblad Master Style) देण्यात आली आहे.

बॅटरी-

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W वायर चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50W वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, OnePlus 10 Pro मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. हा स्मार्टफोन Emerald Forest आणि Volcanic Black या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. (हेही वाचा: 31 मार्चपासून 'या' स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; इथे पहा यादी)

किंमत–

OnePlus 10 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची भारतात किंमत 66,999 रुपये आहे. याशिवाय, हा स्मार्टफोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये देखील उपलब्ध असेल, ज्याची किंमत 71,999 रुपये आहे.