Consumer Protection (Photo Credits: Pixabay.com)

बाजारातून सौंदर्यप्रसाधने, खाद्य उत्पादने किंवा कोणतीही एफएमसीजी वस्तू खरेदी करताना आपण , पॅकिंग, कालबाह्यता तारीख, प्रमाणपत्र प्रमाणीकरण, किंमत अशा सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण बाजारात अनेक बनावट उत्पादने आली आहेत आणि या उत्पादनामधून खऱ्या वस्तूंची ओळख करणे कठीण आहे. याच्यावर उप्पाय म्हणून भारत सरकार, ग्राहक व्यवहार विभाग आणि अन्न सुरक्षा व मानदंड प्राधिकरण (FSSAI) यांनी आता स्वयंसेवी संस्थेद्वारे एक अॅप तयार केला आहे. 'स्मार्ट कंझ्युमर' (Smart Consumer) असे या अॅपचे नाव असून, याद्वारे उत्पादनांबद्दल ग्राहकांना अचूक माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. चला पाहूया हे अॅप काय नक्की कसे कार्य करते

  • प्रथम प्ले स्टोअर (Play Store) मधून स्मार्ट कंझ्युमर नावाचा अॅप डाउनलोड करा. लक्षात ठेवा ज्या अॅपखाली GS1 लिहिले तेच डाऊनलोड करा. हे Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.
  • हे अॅप उत्पादनाच्या मागील बाजूस दिलेल्या बारकोड स्कॅन करतो.
  • अॅप सुरु केल्यावर आपण ज्या उत्पादनाबद्दल जाणून घेऊ इच्छिता, त्या उत्पादनाचा कोड स्कॅन करा. (हेही वाचा: औषधाची गॅरेंटी तरीही टक्कलावर उगवले नाहीत केस; कंपनीला १४ हजार रुपयांचा दंड)
  • जर उत्पादनावर बारकोड नसेल तर बारकोड (जीटीआयएन) वर लिहीलेला नंबर प्रविष्ट करा.
  • स्कॅन केल्यावर, त्या उत्पादनाबद्दलची सर्व माहिती आपणाला दिसेल. यात निर्माता, किंमत, तारीख, FSSAI परवाना यांसारखी माहितीही असेल.
  • जर अशा प्रकारची माहिती मिळाली नाही तर समजावे, उत्पादकाने ही माहिती दिली नाही याचा अर्थ हे उत्पादन बनावट आहे.

तर अशा प्रकारे तपासून खरेदी केल्याने तुमच्या आहारात अथवा जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारची बनावट अथवा भेसळयुक्त उत्पादने असणार नाहीत.