Nokia C1 Plus (Photo Credits-Twitter)

Nokia C1 Plus बद्दल गेल्या काही दिवसांपासून बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे या बातम्यांना आता कंपनीने पूर्णविराम दिला असून त्यांचा नवा Nokia C1 Plus स्मार्टफोन अखेर ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. अॅन्ड्रॉइड 10 अॅडिशनवर आधारित Nokia C1 Plus हा स्मार्टफोन गेल्या वर्षात लॉन्च करण्यात आलेल्या Nokia C1 चे ही अपग्रेडेड वर्जन आहे. यामध्ये काही खास फिचर्स ही युजर्सला मिळणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टफोनमध्ये युजर्सला शानदार 4G स्पीडची सुविधा मिळणार आहे.

Nokia C1 Plus या स्मार्टफोनची किंमत EUR 69 म्हणजेच 6177 रुपये आहे. हा स्मार्टफोन या महिन्याचा अखेरला सेलसाठी उपलब्ध करावा लागणार आहे. रेड आणि ब्लू दो कलर वेरियंट मध्ये खरेदी करता येणार आहे. सध्या अमेरिकेत सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. मात्र भारत आणि अन्य दोन देशात याची किंमत उपलब्धतेबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.(Samsung Lunch 110" Micro LED TV: सॅमसंग ने लॉन्च केला 110 इंचाचा नवा मायक्रो LED टीव्ही; जाणून घ्या, काय आहे किंमत आणि खासियत?)

या स्मार्टफोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेश्यो दिला आहे. जो नॉच शिवाय येणार आहे. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. फोनच्या साइड पॅनलमध्ये वॉल्यूम आणि पॉवर बटण ही दिले आहेत. हँडसेट एक डुरबेल पॉली कार्बोनेट शेलसह येणार आहे.(Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमतीसह खासियत जाणून घ्या)

नोकियाच्या या फोनसाठी 5.45 इंचाचा एचडी+प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे स्क्रिन रेज्योल्यूशन 1600X720 पिक्सल आहे. हा फोन 1.4GHz Quad Core प्रोसेसर वर काम करणार आहे. यामध्ये 1GB रॅम ही दिला आहे. यामध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. जो मायक्रोएसडीच्या मदतीने 128जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. ऐवढेच नाही तर अॅन्ड्राइड10 गो अॅडिशनवर आधारित हा स्मार्टफोन डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटन दिले आहे.