नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन Nokia 5.4 स्मार्टफोनचा आज पहिलाच भारतात सेल असणार आहे. नोकिया 5.4 स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर शानदार ऑफर मिळणार आहे. प्रमुख फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Nokia 5.4 मध्ये 4,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. या व्यतिरिक्त युजर्सला फोनमध्ये Sanpdragon 662 प्रोसेसर मिळणार आहे.
नोकिया 5.4 मध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाणार आहे. जो पंच होल डिझाइनसह येणार आहे. याचा ऑक्टेक्ट रेश्यो 19:5:9 असणार आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर सपोर्ट मिळणार आहे. Nokia 5.4 स्मार्टफोन अॅन्ड्रॉइ़ड 10 बेस्ड असणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फोनला लवकरच अॅन्ड्रॉइड 11 मध्ये अपडेट दिले जाणार आहे. फोनमधील स्पेस मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे. जर फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी Nokia 5.4 रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP असणार आहे.(Lenovo Tab P11 Pro भारतात लाँच, दमदार फिचर्स असलेल्या या टॅबलेटची काय आहे किंमत?)
तसेच 5MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP ची मायक्रो लेन्स सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी दिली गेली असून ती 10W चार्जरच्या मदतीने चार्ज केली जाणार आहे.
नोकिया 5.4 स्मार्टफोन 4GB रॅम+64GB स्टोरेज आणि 6GB रॅम+64GB स्टोरेज वेरियंटमध्ये येणार आहे. याच्या 4GB रॅम असणाऱ्या वेरियंटची किंमत 13,999 रुपये आणि 6GB रॅमच्या वेरियंटची किंमत 15,4999 रुपये आहे. तर स्मार्टफोनवर Axis बँककडून पाच टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना डिवाइसवर 2800 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे. तसेच नोकिया 5.4 स्मार्टफोन प्रति महिना 2344 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर खरेदी करता येणार आहे.