![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/06/Untitled-design-2021-06-05T154643.132-380x214.jpg)
Noise कंपनीने भारतात एक जबरदस्त TWS ईयरबड्स लाँच केला आहे. या ईयरबड्स सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 15 तासांचा बॅकअप देण्यात आला आहे. त्याचबरोबर Noise Buds Air Mini हा अधिकृतरित्या लाँच करण्यात आला आहे. या ईयरबड्सची किंमत 1299 रुपये आहे. ही ईयरबड्स फ्लिपकार्ट (Flipkart) आणि नॉइज (Noise) कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन हा ईयरबड्स खरेदी करावा.
Noise Buds Air Mini दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. यात पर्ल व्हाइट आणि जेट ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. आवाज आणि बॅटरी लाईफच्या बाबतीत यात जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Xiaomi कंपनीचा Mi 11 Lite लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या संभाव्य किंमतीसह खासियत
They're finally here!#AirBudsMini launched exclusively on Flipkart & https://t.co/ZB7j37LTua.
Hurry up and make them yours.#SmallSizeBigSurprise#NoiseAudio#BigLaunch pic.twitter.com/BCBzz1LQeE
— Noise (@gonoise) June 3, 2021
Noise Buds Air Mini च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात क्लिअर साउंट क्वालिटीसाठी 14.2mm चा ड्राइवर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर हा Earbuds TruBass टेक्नोलॉजी आणि वेगवेगळे mics देण्यात आले आहे. ज्यामुळे कॉलिंग दरम्यान तुम्हाला जबरदस्त अनुभव मिळेल. कंपनीने दावा केला आहे की, या ईयरबड्समध्ये 15 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच हे ईयरबड्स 100% चार्ज करण्यासाठी केवळ दोन तास लागतात.
त्याचबरोबर याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात चार्जिंग इंडिकेटर्ससुद्धा दिले गेले आहेत. जे तुम्हाला हा ईयरबड्स चार्ज होण्यास अजून किती वेळ ते दर्शवते. कनेक्टिव्हिटीसाठी यात Hyper Sync technology आणि 5.0 ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. हे ईयरबड्स अॅनड्रॉईड आणि आयओएस या दोघांना सपोर्ट करतो. तुम्ही याला लॅपटॉप आणि कम्प्यूटरलासुद्धा कनेक्ट करु शकता. हा स्मार्ट टच कंट्रोल आणि IPX4 स्वेट रेसिस्टंटसह येतो.