व्हॉट्सअॅप (WhatsApp) कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी ((WhatsApp User) नवनवीन अपडेट (WhatsApp Update) घेवून येतो. आता WhatsApp beta for iOS 22.24.0.77 update या नव्या व्हर्जनमध्ये (WhatsApp Version) व्हॉट्सअॅप त्याचा नवा कॅलेडर फिचर (WhatsApp Calendar Feature) घेवून येत आहे. या फिचरनुसार तुम्ही तुमचे जुने अगदी वर्षांपूर्वीचे मेसेजेस सहज तारखेच्या माध्यमातून शोधू शकता. म्हणजे उदाहरणार्थ कुणीतरी पाठवलेला एप्रिल २०१९ मधला मेसेल तुम्हाला या फिचरच्या माध्यमातून सहज एका क्लिकवर (Click) शोधता येणार आहे. सध्या तरी या नव्या फिचरची टेस्टींग (Testing) सुरु असल्याने हा फिचर काहीच व्हॉट्सअप वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. तरी अगदी काहीच दिवसात हा भन्नाट फिचर सगळ्या व्हॉट्सअप धारकांना सहज वापरता येणार आहे. तसेच व्यक्तीक चॅट बॉक्स (Chat Box) किंवा ग्रुप चॅट (Group Chat) या दोन्हीत तुम्हाला हा फिचर सहज वापरता येणार आहे. अनेक व्हॉट्सअॅप वापरकर्ते (WhatsApp User) या नव्या कॅलेडर फिचरच्या प्रतिक्षेत आहेत.
व्हॉट्सअपवर तुम्ही कुणाचीही चॅट ओपन केली की तुम्हाला वरती त्या व्यक्तीचं नाव, व्हिडीओ कॉल (Video Call) सिंबल, ऑडिओ कॉल (Audio Call) सिंबल आणि बाजूला तिन ठिपके असे एकूण तीन सिंबल दिसतात. त्यापैकी सगळ्यात शेवटच्या म्हणजे तिन ठिपके असलेल्या ऑप्शनवर (Option) क्लीक केल्यास तुम्हाला व्ह्यू कॉनटॅक्ट (View Contact), मिडीया-लिंक-डॉक (Media Link Doc), सर्च (Search), म्यूट नोटिफिकेशन (Mute Notification), डिसअपेरींग मेसेजेस (Disappearing Messages), वॉलपेपर (Wallpaper) आणि मोअर (More) अशी वेगवेगळी ऑप्शन्स दिसतात. पण या सगळ्यात एक आणखी ऑप्शन अड होणार आहे आणि ते म्हणजे कॅलेडर (Calendar). (हे ही वाचा:- WhatsApp Update: आता एकाचं व्हॉट्सअप अकाउंट वापरा दोन वेगवेगळ्या अन्ड्रॉइड फोनवर, व्हॉट्सअपचा नवा भन्नाट फिचर)
कॅलेंडर (Calendar) या ऑप्शनवर क्लीक केलं की तुम्हाला तुमच्या पुढे तिन ऑप्शन दिसतील. वर्ष (Year), दिनांक (Date) आणि महिना (Month) यापैकी तुम्हाला हवा असलेल्या तारखेनुसार तुम्ही तुमच्या मेसेजेस नक्की शोधू शकता. म्हणजे अगदी काही क्लीकवर (Click) तुम्हाला तुमचा वर्षांपूर्वीचा डेटा (Data) सहज तुमच्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) उपलब्ध होणार आहे.