WhatsApp Update: आता एकाचं व्हॉट्सअप अकाउंट वापरा दोन वेगवेगळ्या अन्ड्रॉइड फोनवर, व्हॉट्सअपचा नवा भन्नाट फिचर
WhatsApp (PC- Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) कायम आपल्या वापरकर्त्यांसाठी (WhatsApp User) नवनवीन भन्नाट फिचर (Feature) घेवून येताना दिसतो. काही दिवसांच्या कालावधीनंतरचं व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट्स (WhatsApp Update) येतात. तर यावेळी व्हॉंटसअॅप पुन्हा एकदा असाचं नवीन फिचर घेवून तुमच्या पुढे हजर होत आहे. ज्यानुसार आता तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप एक नाही तर दोन अनरॉइड (WhatsApp Android Phone) फोनवर वापरु शकता. काही व्हॉट्सअप वापरकर्त्यांचा फोन सिंगल सिम (Single Sim) असतो त्यामुळे दोन फोन नंबर वापरण्यासाठी त्यांना दोन मोबाईल (2 Mobile) हाताळणं आवश्यक असतं. पण यावेळी तुमच्या एका नंबरवर अॅक्टीव्ह (Active) असलेलं व्हॉट्सअप तुम्हाला दुसऱ्या फोनमध्ये वापरता येत नाही. कधी फोनची बॅटरी डिसचार्ज (Mobile Battery Discharge) झाली किंवा फोन खराब झाला अश्यावेळी तुमचचं व्हॉट्स अप तुम्हाला तुमच्या स्पेअर फोनमध्ये (Spare Phone) सुरु करता येत नाही त्यासाठीचं व्हॉट्सअॅप (New Whats App Update) हा नवा अपडेट घेवून आला हे ज्यानुसार तुम्ही तुमचं व्हॉट्सअप सहज तुमच्या दुसऱ्या अनड्रॉइड फोनमध्ये वापरु शकता.

 

अँड्रॉइड मोबाईलच्या ऑथॉरिटीनुसार व्हॉट्सअप नवीन फीचर वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट एका स्मार्टफोनवरून दुसऱ्या स्मार्टफोनशी सहज लिंक करता येईल. म्हणजेचं तुमच्या दुसऱ्या फोनमध्ये तुम्हाला दुसऱ्या नंबरच्या आधारे दुसर व्हॉट्सअप सुरु करण्याची काहीही गरज नाही. तर तुम्ही तुमच्या फोनवर व्हॉट्स अप ऑपरेट करता त्याच प्रमाणे तुम्हाला दुसऱ्या फओनवर देखील व्हॉट्सअप ऑपरेट करता येईल. शिवाय दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअप वापरताना तुमचा सगळा डेटा तुमच्या नव्या फओनवर बॅकअप होईल त्यामुळे तुमचा कुठल्ही प्रकारचा डेटा गमवण्याची भिती नसेल तसेच तो डेटा सहज हाताळण्याची तुम्हाला मुभा असेल. (हे ही वाचा:- WhatsApp Privacy: गोपनियनतेची मिसाल देणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या 50 कोटी युजर्सचा डेटा लिक, भारतासह इतर 84 देशाच्या युजर्सचा डेटा थेट विक्रीला)

 

एका फोनवरील व्हॉट्सअप कसं वापरालं दुसऱ्या अन्ड्रॉइड फोनवर:-

  • तुमच्या पहिल्या फोनमध्ये तुमच्याकडे व्हॉट्सअपचं WhatsApp v22.25.8 बीटा व्हर्जन असणं अनिवार्य आहे.
  • तसेच तुमच्या दुसऱ्या फोनमध्येही WhatsApp v22.25.8 बीटा व्हर्जन इंस्टाल करा.
  • तुमच्या पहिल्या फोनचा व्हॉट्सअप क्यूआर कोड दुसऱ्या फोनच्या व्हॉट्सअपवर स्कॅन करा
  • त्यानंतर तुमचा दुसरा अन्ड्रॉइड फोनला तुमच्या पहिल्या फोनचा व्हॉट्सअप अक्सेस मिळेल.
  • त्यानंतर पहिल्या अन्ड्रॉइड फोनवरुन दुसऱ्या फोनवर अन्ड्रॉइड चॅट ट्रान्सफर होईल
  • आता तुम्ही सहज दुसऱ्या फओनवर व्हॉट्सअप हाताळू शकाल.