धमाकेदार फिचर्ससह लवकरच लाॅन्च होणार Motorola चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन
Motorola | (Photo Credits: Motorola)

स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोला (Motorola) आपला शानदार डिवाइस मोटो जी 71 5जी (Moto G71) च्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. कंपनीनुसार, हे डिवाइस 10 जानेारीला लॉन्च केला जाणार आहे. यापूर्वी कंपनीने मोटो जी31, मोटो जी 41 आणि मोटो जी52 उतरवले होते. मोटोरोलाच्या टीजरनुसार, मोटो जी 71 5जी स्मार्टफोनमध्ये शानदार डिस्प्ले दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती देण्यात आलेली नाही. असे मानले जात आहे फोन ओएलईडी स्क्रिन लैस असणार आहे.

लीक रिपोर्ट्सनुसार, मोटो जी 71 5जी स्मार्टफोन 6.43 इंचाचा ओएलईडी डिस्प्लेसह येणार आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 1080X2400 पिक्सल असणार आहे. यामध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 6जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसरचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.(Vivo V23 Pro 5 जानेवारीला होणार भारतात लाॅन्च, स्मार्टफोन 12GB रॅमसह मिळणार)

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Moto G71 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल. याला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स दिला जाऊ शकतो. याशिवाय फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

Moto G71 स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी लैस असू शकतो, जो 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याशिवाय फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. त्याच वेळी, हा फोन ग्रीन, ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.