Central Govt Cyber Policy: केंद्र सरकार मोबाईल वापरकर्त्यांसाठी काही नवी सुरक्षा मानके विकसित करण्यावर भर देत आहे. त्यासाठी सरकार एक आराखडा लवकरच एक आराखडा (Modi Govt Plan For Data Theft) तयार करत आहे. ज्यामुळे हेरीगिरी, डेटाचा गैरवापर आणि इतर समाजविघातक गोष्टी रोखण्यास मदत होऊ शकेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (Meity) मंगळवारी याबात एक ट्विट केले आहे. ज्यात म्हटले आहे की, आमच्यासाठी नागरिकांच्या फोनची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही आवश्यक सुरक्षेसाठी मानके विकसीत करण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी सरकार विविध विभागांशी सल्लामसलत करत आहे.
भारत हा इलेक्ट्रॉनिक्सच्या जागतिक मूल्य साखळीत एक नवा आणि दमदार, विश्वासार्ग खेळाडू म्हणून उदयास येत आहे. अशा वेळी नागरिकांचे मोबाईल फोन आणि त्यातील ऍप्लिकेशन्सची सुरक्षा महत्वाची आहे. म्हणूनच त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. सरकार स्टेकहोल्डर्सशी सल्लामसलत करत आहे, असे Meity ने ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Mobile Blast In Pocket Video: मोबाईल वापरता, सावधान! खिशातचं झाला मोबाईलचा स्फोट, पहा व्हिडीओ)
दरम्यान, सरकारचे हे धोरण वापरकर्त्याला त्याच्या डेटा गैरवापरापासून रोखते. तसेच विविध अॅप्सद्वारे हेरगिरी आणि इतर सायबर गुन्ह्यांपासूनही सुरक्षा देते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी आपल्या वृत्ताद्वारे दिली आहे.