आता 30 सेकंद पर्यंत सुरु राहणार मोबाईलची रिंग, TRAI कडून सर्व ऑपरेटर्सला आदेश
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

इंटरकनेक्ट युजेस चार्ज (IUC) संबंधित गेल्या काही दिवसांपासून चढउतार पहायला मिळत आहे. आययुसी बाबात जिओ आणि दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांच्या दरम्यान वाद वाढत चालला आहे. ज्यावेळी एअरटेलने जिओसाठी 20 सेकंदाची मोबाईल रिंग ठेऊन जास्त आययुसी कमावण्यचा आरोप लगावण्यात आला होता. जिओच्या 20 सेकंद रिंग टाइम पाहून अन्य कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या मोबाईल रिंगच्या वेळेत घट केली. त्यानंतर आता ट्रायकडून सर्व ऑपरेटर्सना 30 सेकंदापर्यंत मोबाईलचा रिंग टाइम ठेवण्यात यावा असे आदेश दिला आहे. ट्रायच्या या निर्णयामुळे जिओला झटका बसला आहे.

ट्रायद्वारे घेण्यात आलेल्या नव्या निर्णयाच्या मते सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना 30 सेकंदापर्यंत रिंगटोन सुरु राहणार आहे. तर इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्ससाठी हा नियम लागू राहणार आहे. ट्रायने असे सांगितले की, कॉलचे उत्तर मिळो अथवा न मिळो तरीही फोनची रिंग 30 सेकंदापर्यंत सुरु राहणे अनिवार्य आहे. एवढेच नाही ऑपरेटर्सना निर्देशन देत असे ही म्हटले की, ऑरिजिनेटिंग कॉलसाठी ऑपरेटरला टर्मिनेटिंग नेटवर्कद्वारे कॉल रिलीज मेसेज मिळाल्यानंतर 90 सेकंदानंतर Unanswered Call रिलिज करणे जरुरी आहे. (खुशखबर! Reliance Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लढविली नवी शक्कल; 5 मिनिट फोनवर बोलल्यास ग्राहकांना मिळणार 6 पैसे कॅशबॅक)

आउटगोईंग रिंगर टाइम बाबत गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या जिओ आणि एअरटेलच्या वादानंतर ट्रायकडून निर्णय घेण्यात आला आहे. एअरटेल सुरुवाती पासूनच त्यांच्या नेटवर्कसाठी 45 सेंकदाचा रिंगर टाइम देत आला आहे. कंपनीचे असे म्हणणे होते की, 45 सेकंद ही फोनचे उत्तर देण्यासाठी योग्य वेळ आहे. तर जिओने आययुसी चार्जेचपासून वाचण्यासाठी त्यांच्या रिंग टाइममध्ये घट करत 20 सेकंद केली. या दरम्यान वोडाफोनने ट्रायला 30 सेकंदपर्यंत रिंगर टाइम असावा असे सांगितले. त्याचसोबत सध्या सुरु असलेल्या आययुसी चार्ज कायमचे बंद करण्याच्या निर्णयावर विचार केला जात आहे. अशी अपेक्षा आहे की, याचा निर्णय 31 डिसेंबर 2019 नंतर जाहीर केला जाईल.