Mi Smart Band 6 लवकरच होणार लाँच, Xiaomi कंपनीने ट्विटद्वारे दिली माहिती
Mi Smart Band 6 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) लवकरच आपला नवा स्मार्टबँड ग्लोबली लाँच करण्याच्या तयारीत आहे. Mi Smart Band 6 असे या बँडचे नाव आहे. येत्या 29 मार्चला होणा-या इव्हेंटमध्ये शाओमी Mi 11 Pro सह हा बँड लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बँड Mi Band 5 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टबँडचे बरेच फिचर्स लीक्स झाले आहेत. या इव्हेंटमध्ये शाओमीचे बरेच गॅजेट्स लाँच होणार आहेत.

लीक्स झालेल्या फिचर्सनुसार, या Mi Smart Band 6 मध्ये मॅग्नेटिक चार्जिंग फिचर असू शकते. त्याचबरोबर यात OLED डिस्प्ले पॅनलसुद्धा दिले जाऊ शकते. या फिटनेस ट्रॅकरचे डिझाईन खूपच आकर्षक असू शकते.

या फिटनेस बँडबद्दल बोलायचे झाले तर, यात ब्लड ऑक्सिजन लेवल डिटेक्शन (SpO2) फीचर असू शकते. त्याशिवाय यात मागील मॉडलनुसार, मोठी डिस्प्ले दिली जाऊ शकते. या स्मार्टबँडमध्ये 30 पेक्षा जास्त स्पोट्स आणि फिटनेस मोड मिळू शकते. हा स्मार्ट बँड स्टँडर्ड आणि NFC कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येईल.

Xiaomi येत्या 29 मार्चला होणा-या इव्हेंटमध्ये Mi 11 Pro आणि Mi 11 Ultra लाँच केले जाऊ शकते. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC असू शकते.

दरम्यान Boat कंपनीने भारतात आपले नवे स्मार्टवॉच (Smartwatch) लाँच केले आहे. Boat Flash Watch असे या स्मार्टवॉचचे नाव असून यात 10 स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ फिचर्स दिले आहेत. राउंड डिस्प्ले असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच एक्टिव ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू आणि विविड रेड अशा तीन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. साउंडच्या बाबतीत आपल्या गॅजेट्समधून अफलातून प्रदर्शन देणा-या बोट कंपनीचे हे स्मार्टवॉच देखील खूपच जबरदस्त आहे.