Mi 10 smartphone (Photo Credits-Twitter)

भारतात एमआय (Mi) कंपनीचा 5G टेक्नॉलॉजी असणारा धमाकेदार स्मार्टफोन Mi 10 येत्या 31 मार्चला लॉन्च करण्यात येणार आहे. एमआय कंपनीच्या या नव्या सीरिजची माहिती कंपनीकडून ट्वीटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच कंपनीने एमआयच्या नव्या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग लाईव्ह Mi च्या वेबसाईटवर दाखवण्यात येणार आहे. गेल्याच महिन्यात Mi 10 Pro हा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.भारतात Mi 10 स्मार्टफोनचे 31 तारखेला दुपारी 12.30 वाजता त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यानंतर प्री बुकिंगला सुरुवात होणार आहे. फोनवर ऑफर्स सुद्धा देण्यात येण्याची शक्यता आहे, मात्र स्मार्टफोनच्या किंमती बाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास फोनमध्ये 6.6 फुल एचडी +(1,080x2,340 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. तसेच ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असणार आहे. रॅम 12 जीबी पर्यंत असण्याची शक्यता आहे. तर 256GB इनबिल्ट स्टोरेज सुद्धा दिला जाऊ शकतो. Mi 10 में क्वाड रियर कैमरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल असणार आहे. 4,780mAh ची बॅटरी आणि 30 वॅट वायरसेल चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.(Flipkart Big Shopping Days Sale 2020 मध्ये Smartphone, AC, Laptop सह 'या' वस्तूंवर बंपर ऑफर्स)

तसेच स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी लवकरच आपला नवीन वायरलेस चार्चर लाँच करणार आहे. येत्या 16 मार्चला हा चार्जर लाँच करणार असल्याचा एक छोटा व्हिडिओ सध्या या कंपनीने आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये #CutTheCord हा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडिओत 16 मार्च तारीख दाखविण्यात आली होती. या व्हिडिओतून जास्त खुलासा करण्यात आला नसला तरी कंपनी वायरलेस चार्जिंग सपोर्ट करण्यासाठी फोनसाठी एक वायरलेस चार्जर किंवा पॉवर बँक लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.