McKinsey Company: कर्मचाऱ्यांना दिली कंपनी सोडण्यासाठी 9 महिन्यांची Paid Leave ची ऑफर

सध्या जगभरात सध्या मंदीचे वातावरण असल्यामुळे अनेक कंपन्यामध्ये नोकरकपात घडत आहे.  ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म मॅकिन्सेने (McKinsey) शेकडो वरिष्ठ कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने (Voluntarily Leave) कंपनी सोडण्यासाठी आणि इतर नोकऱ्या शोधण्यासाठी पैसे देण्याची ऑफर दिली आहे. ब्रिटीश दैनिक द टाइम्सने अहवाल दिला आहे की, सेक्टर-व्यापी मंदीच्या दरम्यान हेडकाउंट कमी करण्याचा हा कंपनीचा प्रयत्न आहे. व्यवसायाच्या यूकेमधील व्यवस्थापकांना "नोकरी शोध" (Job Search) कालावधीसाठी नऊ महिने पेड लिव्हचा पर्याय सादर केला जात आहे. (हेही वाचा - Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात)

मॅकिन्से कंपनीने नोकरी सोडण्यास इच्छुक असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना नऊ महिन्याच्या पगारासोबतच कर्मचाऱ्यांना करिओर कोचिंग सेवा देखील मिळणार आहे. या कालावधीत, प्रश्नातील कर्मचारी क्लायंट प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याऐवजी नवीन रोजगार संधी शोधण्यासाठी त्यांचे कामाचे तास समर्पित करू शकतात. या संपूर्ण कालावधीत त्यांना त्यांचा पूर्ण पगार मिळत राहील, जर त्यांनी संपूर्ण नऊ महिन्यांचा कालावधी वापरला तर तो शेकडो हजार पाउंड्स इतका असू शकतो.

मेकेन्से कंपनीने गेल्या वर्षी सुमारे 1400 नोकऱ्या कमी करण्याची योजना जाही केली होती. ही नोकर कपात ही त्यांच्या एकुण कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के इतकी होती.  2021 मध्ये कंपनीने 15 अब्ज डॉलरची कमाई केली होती आणि 2022 मध्ये कंपनीने स्वतःचा आकडा पार केला होता. मॅकिन्से कंपनीत एकूण 45 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात, या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, टाळेबंदीचा नेमका आकडा अजून ठरलेला नाही.