Facebook चा चेहरामोहरा बदलणार; Mark Zuckerberg ने सादर केले नवे डिझाईन, मेसेंजरद्वारे करता येणार हॉटेल बुकिंग
फेसबुक (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या सोशल मिडीयामध्ये बराच मोठा भाग फेसबुकने (Facebook) व्यापला आहे. आज अशी क्वचित व्यक्ती असेल जिचे फेसबुकवर खाते नाही. फेसबुकनेही वेळोवेळी आपले रूप बदलत सतत नव्या गोष्टी युजर्सना देऊ केल्या. आता पुन्हा एकदा काही नवी फीचर्स समाविष्ट करून फेसबुक एका नव्या ढंगात आपल्या समोर येणार आहे. मार्क झुकेरबर्गने (Mark Zuckerberg) फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. या नव्या डिझाईनमुळे युजर्सना प्रायवेट फीड उपलब्ध होणार आहे.

फेसबुकचे हे नवे डिझाईन युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. युजर्सने कोणताही ग्रुप जॉईन केल्यास त्याला पर्सनलाइज्ड न्यूज फीड मिळणार आहे. फेसबुक त्याच्या मेसेंजरमध्ये नवे अपडेट्स घेऊन येत आहे, फेसबुक मेसेंजरमध्ये अपॉइंटमेंट हे नवे फीचरही लाँच होणार असून, याच्या मदतीने हॉटेलचे बुकींग करता येणार आहे. मेसेंजरमध्ये ग्रुप व्ह्युविंग (Group Viewing) नावाचे नवे फीचर येणार आहे, ज्यामध्ये अनेक मित्र एकाचवेळी एक व्हिडीओ पाहू शकणार आहेत. (हेही वाचा: दररोज फेसबुकवरील 8 हजार लोकांचा होत आहे मृत्यू; जाणून घ्या त्यानंतर अकाऊंटचे काय होते)

फेसबुकने काही भारतीय म्युझिक कंपन्यांशी करार केला आहे, त्यामुळे फेसबुकच्या नव्या फीचरद्वारे तुम्हाला तुमचे आवडते गाणे शेअर करणे अजून सोपे होणार आहे. गेम खेळण्याची आवड असणाऱ्या युजर्ससाठी फेसबुक एक नवा सेक्शन समाविष्ट करणार आहे. ज्यामध्ये तुम्ही मित्र मैत्रिणींसोबत विविध गेम खेळू शकता. या सेक्शनमध्ये युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तर अशाप्रकारे फेसबुक मेसेंजरसह आपल्या एकूणच नव्या लुकमध्ये बदल करणार आहे.