WhatsApp/Photo Credits: Pixabay

जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) करोडोच्या संख्येने युजर्स आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्या किंवा संदेश व्हायरल होत आहे. या मेसेजेसमुळे समाजात तणावाची परिस्थिती निर्माण होत मॉब लिचिंगची प्रकरणे समोर आली आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. तर मद्रास उच्च न्यायालयाने तेथीलच एका आयआयटीमधील प्राध्यपक व्ही. कामाकोटी यांच्याकडे या संदर्भात मदत मागितली आहे. त्याचसोबत व्हॉट्सअॅपवरील मेसेज कसे ट्रॅक केले जातात याबद्दल तांत्रिक रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.

प्राध्यापक मद्रास न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप संदर्भातील याचिकांच्या माध्यमातून त्यावर अधिक माहिती मिळवत आहेत.तर प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील प्रोफाइल्स ऑथेंटिकेशन साठी लिंक करण्याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र व्हॉट्सअॅपचा असा दावा आहे की, युजर्सचे मेसेज ट्रेस करणे सहजासहजी शक्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु आयआयटीच्या प्राध्यपकांनी मेसेज ट्रेस करणे शक्य असल्याचे म्हटले आहे.(Android स्मार्टफोन्सवर WhatsApp वरील चॅट चे बॅकअप किंवा रिस्टोर कसे कराल, पाहा सोप्या ट्रिक्स)

तसेच व्हॉट्सअॅपवरील मेसेज ओरिजनल आयडेंटीफिकेशन टॅग नसला तरीही त्याच्या एनक्रिप्शनला नुकसान पोहचू शकते. यामुळे व्हॉट्सअॅपवरील मेसेज ट्रॅक होण्याची शक्यता आबे. तर  न्यायालयाला प्राध्यपकाने स्पष्टीकरत देत असे म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपमधील काही गोष्टी किंवा मेसेज फॉरवर्डिंगच्या संदर्भात बदल केल्यास मेसेज ट्रॅक होऊ शकत नाही असे कामाकोटी यांनी म्हटले आहे.