Lenovo ने भारतात लॉन्च केला Yoga S940 लॅपटॉप; पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत
Lenovo Yoga S940 Laptop (Photo Credits : IANS)

चीनी कंपनी लेनोवो (Lenovo) ने बुधवारी (31 जुलै) भारतात अल्ट्रा स्लिम पीसी 'योगा एस940' (Yoga S940) लॉन्च केला. आर्टिफिसियल इंटेलीजेंस (Artificial Intelligence) आणि अॅडवान्स्ड ऑडियो टेक्नोलॉजी असलेल्या या लॅपटॉपची किंमत 23,990 रुपये आहे. भारतात अल्ट्रा-स्लिम सेगमेंटला खूप मागणी असून लॅपटॉपवर अधिक वेळ काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा उत्तम पर्याय आहे.

लेनोवो इंडियाचे सीईओ आणि एमडी राहुल अग्रवाल यांनी सांगितले की, "लेनोवो योगा एस940 हा लॅपटॉप पावर युजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. प्रायव्हसी आणि सिक्युरीटीला महत्त्व देणाऱ्या लोकांसाठी हा लॅपटॉप खास ठरेल. त्याचबरोबर ज्या लोकांना सुविधापूर्ण पर्सनलाईज्ड एक्सपीरिएन्स हवा आहे. त्यांना टार्गेट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत." (लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी खास '४' टिप्स !)

लेनोवो इंडिया ट्विट:

'योगा एस940' हा जगातील पहिला कलर ग्लास असलेला लॅपटॉप असून याची निर्मिती खास पद्धतीने करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 4के एचडीआर डिस्प्ले आणि 500 निट्स पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉस स्पीकर सिस्टमसह हा युजर्संना वेगळ्या प्रकारचा अनुभव देण्यास सक्षम आहे. (Asus ने लॉन्च केला दोन स्क्रीन असणारा लॅपटॉप; पहा काय आहेत फिचर्स)

योगा एस940 चे व्हर्जन 1.2 किलोग्रॅम आहे आणि हा लॅपटॉप 12.2 एमएम इतका पातळ आहे. यात आठव्या जनरेशनचा आय7 प्रोसेसर लावण्यात आलेला आहे. पोर्टेबल योगा एस 940 विंडोस 10 सह उपलब्ध आहे. तसंच यात 16 जीबी एलपीडीडीआर 3 मेमेरी आणि 1 टीबी पीसीआय एसएसडी स्टोरेज देण्यात आला आहे.